स्वदेस फाऊंडेशन तर्फे माणगाव ,महाड आणि श्रीवर्धन रुग्णालया मध्ये १००० पीपीई किटचे वाटप.
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) स्वदेस फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत कोरोणाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचे कोरोना पासून बचाव कण्यासाठी १००० पीपीई किटचे वाटप नुकतेच करण्यात आले.
स्वदेशफाउंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार व वरिष्ठ समन्वयक नयन पोटले यांच्या हस्ते माणगाव उपजिल्हा रुग्णालया ला ४०० पीपीई किट तहसिलदार प्रियांका आयरे व डॉ. प्रदीप इंगोले यांना सुपूर्त करण्यात आले. महाड ग्रामीण रुग्णालय ला ३०० पीपीई किट तहसिलदार चंद्रसेन पवार व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.जगताप यांना देण्यात आले.तर श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉ. सोनम, डॉ. अली, औषध निर्माता निलेश पवार यांच्या कडे माणगाव उपजिल्हा रुग्णालय ला ३०० पीपीई किट देण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वदेस फाउंडेशन करीत असलेल्या कामाचे कौतुक करून स्वदेस फाउंडेशनचे प्रमुख रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे व स्वदेस टीमचे श्रीवर्धन तहसिलदार सचिन गोसावी व महाड तहसीलदार चंद्रसेन पवार व माणगाव तहसिलदार प्रियांका आयरे मॅडम यांनी विशेष आभार मानले.
No comments:
Post a Comment