Friday, 29 May 2020

म्हारळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच निलेश देशमुख यांनी वाढदिवस लावला सत्कर्मी !

म्हारळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच निलेश देशमुख यांनी वाढदिवस लावला सत्कर्मी!



कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील युवा नेते निलेश शिवाजी देशमुख यांनी त्यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी कामे करून साजरा केल्याने त्यांच्या या कृतीचे परिसरातून कौतुक होत असून असेन इतरांनीही केले तर कोरोनावर सहज मात करता येईल असे जाणकारांना वाटते.
कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक श्रीमंत असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद निलेश देशमुख यांनी भूषविले असून त्यांचे वडील कै शिवाजी देशमुख हे देखील अनेक वर्षे म्हारळ ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्याच्या कडून मिळालेल्या समाजकार्याचे धडे त्यांचे पुत्र निलेश देशमुख हे गिरवीत असून रेशन कार्ड, विद्यूत जोडणी, पुर, किंवा काही अपघात प्रत्येक वेळी निलेश देशमुख मदतीसाठी तयार असत.
आता त्यांचा वाढदिवस, तो साजरा न करता त्या पैशातून गोरगरिबांना, विधवा, निराधार, गरजू लोकांना ५०० धान्याची पाॅकिट, देऊन सगळ्या परिसरात सॅनिटायझर ची फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करुन थांबले नाहीत तर आयुष मंत्रालय प्रमाणित आयुर्वेद औषध मंत्रालय प्रमाणित आर्सेनिक अल्बम ३० गोळ्या वाटप करण्यात आले यामुळे प्रतिकार शक्ती वाढते असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले असे देशमुख यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लाॅकडाऊण च्या काळात वाढदिवसाच्या निमित्ताने निलेश देशमुख यांनी केलेले काम नक्कीच कौतुकास्पद आहे.

No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...