डोंबीवलीत मनसेच्या सहकार्याने रक्तदान शिबीर संपन्न*
डोंबीवली - कोरोना विषाणुच्या संकटामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असल्याने मनसे गोग्रासवाडी,डोंबिवली शहर व प्लाझ्मा ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक २५ मे २०२० रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सामाजिक बांधिलकीतून या संकटकाळात आपल्याच समाजबांधवांसाठी आपण मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन शिबीराचे संयोजक व माजी नगरसेवक मनोज प्रकाश घरत यांनी केले होते. सदर आवाहनास डोंबिवलीकर नागरीकांनी प्रचंड प्रतिसाद दिला व तब्बल १०५ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.रक्तदान शिबीराची सुरुवात सौ.विणा कटारे या महिलेने रक्तदान करुन केली व शिबीरात १२ महिलांनी रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबीराचे उद्घाटन नेहमी रक्तदान करणाऱ्या प्रमोद काका काणे व पाथर्लीकर रोहिदास शेठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.शिबीर स्वयंवर हाॅल,गोग्रासवाडी,डोंबिवली (पुर्व) येथे सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत राबविण्यात आले
या शिबीराला मनसेचे स्थानिक आमदार राजु दादा पाटील उपस्थित होते.त्याचबरोबर ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश भोईर,हर्षद पाटील,प्राजक्त पोतदार,सागर जेधे,दिपक शिंदे,संदिप म्हात्रे,सागर तांबे,शितल लोके,सुमेधा थत्ते,ओम लोके व अनेक मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी रविंद्र गरुड,संदिप शिंदे,केदार चाचे,महेश खताते,सूर्यकांत पारधे,बाळकृष्ण उतेकर,अविनाश शिर्के,दिपेश पाटील,भूषण म्हात्रे यांनी खुप मेहनत घेतली.शिबिरासाठी प्लाझ्मा रक्तपेढी ची संपुर्ण टिम व स्वयंवर हाॅलचे स्वप्निल किरकिरे यांनी विशेष सहकार्य केले.
No comments:
Post a Comment