Tuesday 26 May 2020

बुध्द विहार समन्वय समितीचे दखल घेण्यासारखे सामाजिक कार्य

बुध्द विहार समन्वय समितीचे दखल घेण्यासारखे सामाजिक कार्य! 


कल्याण (संजय कांबळे) कोणत्याही प्रकारची प्रसिद्ध नाही, फोटो सेशन नाही किंवा बडेजाव  नाही केवळ त्याचे कार्यकर्त्यांच्या नजरा असतात त्या कोणी उपाशी पोटी आहे, का कुणाला जेवण मिळत नाही का किंवा कोणाच्या घरी चुल न पेटण्यामागचे काय कारण अशा विविध घटना वर प्रत्यक्षात कृती करुण आज मितीस हजारो गोरगरिबांची व भटक्या आणि भिकारी लोकांची "आधारवड संस्था" बनली आहे म्हारळ गावातील बुध्द विहार समन्वय समिती.


गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून देशात लाॅकडाऊण सुरु आहे अनेकांचे कामधंदे बंद पडले आहेत. हातावर पोट असणाऱ्या ची अवस्था खूपच बिकट झाली आहे. कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वाधिक परप्रांतीय, मजूर, निराधार लोक, मनोरुग्ण, कष्टकरी कामगार, भिकारी, याचे वास्तव्य आहे. लाॅकडाऊण मध्ये यांच्या वर उपासमारीची वेळ आली होती. हे बघून बुध्द विहार समन्वय समिती म्हारळ, उल्हासनगर, कल्याण यांच्या वतीने सर्वानी एकत्र येऊन सर्वच समन्वयक आर्थिक - श्रमिक दानातून माणूसकी जपत यांना एक वेळचे जेवण, तसेच इतरांना धान्याचे किट, तसेच कल्याण येथील पोलीसाना चहा बिस्कीट वाटप करण्यात येत आहे. हे झाले माणसांच्या बाबतीत पण समितीने मुक्या प्राण्यांची देखील काळजी घेतली आहे गाई म्हशी, बकरी, भटकी कुत्री यांना चारा पाणी दिले जाते आहे. हे काम गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू आहे पण त्यांनी कुठेही सोशल मीडिया किंवा पेपरबाजी केली नाही. त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या मागे सर्व कार्य विहारे व संघटना एकत्र येऊन करित असून यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले ते धार्मिक विंग प्रमुख नवीन गायकवाड यांचे, असे बुध्द विहार समन्वय समितीने सांगितले. 

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...