Saturday, 30 May 2020

सांगली येथील फ्लॅट विक्रीत फसवणूक, सोलापूरच्या उपमहापौरांना अटक‌ !

सांगवी येथील फ्लॅट विक्रीत फसवणूक,सोलापूरच्या उपमहापौरांना अटक !


पिंपरी - सांगवी येथील एक फ्लॅट ४ ते ५ जणांना विकल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना सांगवी पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून अटक करण्याची कारवाई सुरू होती. फसवणुकीचा हा प्रकार २०१८-२०१९ या कालावधीतील आहे. सांगवी पोलिसात काळे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.


या प्रकारणामध्ये आणखी काही जणांचा समावेश असून यापूर्वीच काहीजणांना अटक झाली आहे. सांगवी पोलिस उपमहापौर काळे यांना ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी (दि.३०) सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस ठाण्यात आले होते. सांगवी पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने काळे यांना ताब्यात घेतले.

रात्री उशिरापर्यंत त्यांच्या अटकेची कारवाई सुरू होती. सांगवी परिसरातील एक फ्लॅट राजेश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ४ ते ५ जणांना विकल्याचे प्रकरण समोर आले होते. फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...