कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्यूकेशन सोसायटी तर्फे माणगांव पोलिसांना पीपीई किट वाटप !
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) माणगांवात कोरोना बाधित रुग्णसंख्या वाढत असताना सामाजिक बंधीलकीतून रोजगार व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्यूकशन सोसायटी माणगाव या संस्थेच्या वतीने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोविड-१९ चा मुकाबला करणाऱ्या माणगांव पोलीस व वाहतूक सेवेतील पोलीस कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी १५ पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन सोसायटी माणगांव मार्फत व रायगड मधील माणगांव येथील सामाजिक , शेक्षणिक व ज्यांना रोजगार , नोकरी नाही अश्या बेरोजगारांना मुंबई, पुणे , महाड , रोहा या ठिकाणी नोकरी मिळवून देण्याचे व मार्गदर्शनाचे काम करते. कोविड १८ योध्याना सुरक्षा म्हणून १५ पीपीई किटचे वाटप होडगाव गावाचे दानशूर व्यक्तिमत्व असणारे आमचे मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन सोसायटी संचालित शिवम काॅंमप्युटर एज्युकेशन सेंटर माणगाव या संस्थेचे सह संस्थापक सुशिलदादा कदम व रायगड भूषण पुरस्कार प्राप्त श्री गोरक्षनाथ नवनाथ मंदिर ढालघर मठाचे अध्यक्ष जेष्ठ गुरुबंधू शांताराम बाळू खाडे उर्फ (खाडे महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रामदास इंगवले यांच्या कडे एकूण १५ पीपीई किट देण्यात आले.
या कार्यक्रमात मुभा रूरल डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. मुरलीधर वाणी व शिवम काॅंमप्युटर एज्युकेशन सेंटर चे संस्थापक श्री भालचंद्र खाडे ,सेल टॅक्स आॅफीसर रायगड विभाग सतीश सावंत, मुरलीधर कदम, जयदास म्हस्के, होडगांव ग्रुप ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री शंकर खाडे , रूपेश खाडे,मा. मुख्याध्यापक सचिन कदम उपस्थित होते.
माणगावात कोविड १९ योध्याना पीपीई किट मिळाल्याबद्दल सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातून संस्थेचे कौतुक होत आहे. माणगावात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असून जास्त धोका असलेल्या पोलीस व वाहतूक कर्मचाऱ्यांना सदरचे किट मिळाल्याबद्दल पोलीस यंत्रणेने संस्थेचे आभार व्यक्त केले आहेत.
फोटो कॅप्शन - पोलीस व वाहतूक कर्मचारी यांना पीपीई किटचे वितरण करताना मान्यवर दिसत आहेत.
No comments:
Post a Comment