Saturday, 30 May 2020

रायते विभाग हायस्कूलच्या शिक्षकांची महाराष्ट्र राज्यातून समुपदेशक म्हणून निवड !

रायते विभाग हायस्कूलच्या शिक्षकांची महाराष्ट्र राज्यातून समुपदेशक म्हणून निवड !


कल्याण (संजय कांबळे) विद्यार्थ्यांना मोफत /नि :शुल्क मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी भारतीय समाज उन्नती मंडळांच्या पद्मश्री आण्णासाहेब जाधव या संस्थेच्या रायते विभाग हायस्कूल रायते या शाळेचे शिक्षक कल्पेश मनोहर शिंदे यांची महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने समुपदेशक म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
देशातील कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण विभागाने अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन तै अडिज महिन्यांनंतर देखील कोराचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेईना. त्यामुळे आता शाळांचे काय, त्या कधी सुरू होणार सुरू झाले तर सोशलडिस्टींग चे काय, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ते कसे भरुन काढायचे यावर शासन विचार विनिमय करित आहे. यातून डिजिटल शिक्षण हा एक पर्याय पुढे आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन हे पण पुढे आले.
यानुसार ज्ञानगंगा घरोघरी समुपदेशक आपल्या दारी ही अभिनव कल्पना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची बुध्दिमता, आवड निवड, मानसिक कल, अभिक्षमता, अभिरुची, व्यक्तीमत्व आणि शरीरयष्टी या सप्तसुत्री चा वापर करुन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे हा मुळ हेतू असून याचा लाभ तळागाळातील, ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी समुपदेशक प्रयत्न करणार आहोत.
यातून इयता आठवी ते बारावी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. इ १० वी कल व अभिक्षमता चाचणी व निकाल २०२०, दहावी बारावी नंतर काय, करिअर च्या विविध वाटा, मानसिक गोंधळ, अस्वस्था, आणि कोरोना प्रादुर्भाव यावर मार्गदर्शन व समुपदेशन होईल यासाठी शासनाने कल्याण तालुक्यातील रायते विभाग हायस्कूल रायते या शाळेचे शिक्षक कल्पेश मनोहर शिंदे यांची निवड केली आहे तरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या ७०४५८१५७०३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ४८ तासात शब्दपूर्ती ! ** माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ५ लाखांचा ध...