*पत्रकाराच्या नजरेतून .कोरोना काळात लढणारा* *शिधावाटप दुकानदार*
कोरोनाच्या प्रादुर्भावाने केंद्र सरकार व राज्य सरvकार नियंत्रण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने अन्नधान्य वाटप व मोफत गहू, तांदूळ गरजू गरीब जनतेला शासनाने नेमून दिलेल्या दराने शिधावाटप दुकानदार कडून करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे प्रशासन कामाला लागले. रेशनिंग अधिकारी आपापल्या विभागाला सूचना देऊन दुकानदाराला कामाला जुंपले. या ठिकाणी जुंपले हाच शब्द मुद्दाम टाकण्याचा उद्देश एवढाच की शासकीय अधिकारी हा पगारदार असतो आणि दुकानदाराला शासनाच्याअधीन राहून काटेकोरपणे नियमाचे पालन करावे लागते. शिधावाटप दुकानदार हा बिनपगारी फुल अधिकारी अशी भूमिका बजावत असतो. यामध्ये जर काही चूक झाली की भ्रष्टाचार आरोपी म्हणून दुकानदाराला जबाबदार धरतात. अनेक नियम, अटी, शर्ती लागू करून शासनाच्या नियमाचे पालन करण्याची सगळी जवाबदारी दुकानदारावर टाकून मोकळे होतात.
आता कोरोनाच्या काळ।मध्ये बोटांचे ठसे न घेता अन्न पुरवठा करणे असताना पुन्हा बायोमेट्रिक मशीनचा वापर करावा असा फतवा काढला. प्रशासन नेमके काय करतात याची कमतरता जाणवत आहे.
कोरोना संसर्ग रोगाची होणारी वाढ लक्षात घेता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या रेशनिंग दुकानदाराच्या संघटनेने आम्हाला चक्क रजा हवी आहे असे निवेदन दिले आहे. यावरून त्यांच्यावर सुध्दा किती ताण आहे याची जाणीव होते. यावरून या लेखातून सरकारला व संबधीत प्रशासन अधिकारी यांना सूचित करतो की, जरी नफ्यात असणारा पण तुटपुंज्या कमिशनवर काम करणारा रेशनिंग दुकानदार हा सुध्दा एक माणूस आहे. त्यांच्या भावनेचा आणि कामाचा ताण लक्षात घेता काही नियमात सूट देऊन सामाजिक कामात त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यावा हि विनंती..
*अरूण ठोंबरे*
9322107521/9527154112
No comments:
Post a Comment