Friday, 12 December 2025

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!!

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!!

कल्याण प्रतिनिधी ता. १३ : नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या वतीने आयोजित ६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. मा. उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशान्वये ०६ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत ठाणे, कल्याण व अंबरनाथ परिसरात विविध उपक्रम राबविण्यात आले.

सप्ताहातील उपक्रम—उत्साहवर्धक सहभाग

दि. ६ डिसेंबर : सहयोग कॉलेज, ठाणे येथे आपत्ती व्यवस्थापन मुलभूत पाठ्यक्रम क्र. २६/२०२५ चा समारोप झाला. ३७ स्वयंसेवकांनी शपथग्रहण केले. मान्यवरांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले.

दि. ८ डिसेंबर : उपनियंत्रण केंद्र, अंबरनाथ येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ३० स्वयंसेवक व अधिकारी यांनी सहभाग घेतला.

दि. ९ डिसेंबर : प्रत्यक्ष आपत्तीस्थितीत साहित्य हाताळणीचे प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. DGCD Disc विजेते श्री. बिमल नथवाणी यांनी मार्गदर्शन केले. ४० स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

दि. १० डिसेंबर : मुख्य नियंत्रण केंद्र, कल्याण येथे नागरी संरक्षण मेळाव्याचे आयोजन झाले. ५० स्वयंसेवक उपस्थित होते.

दि. ११ डिसेंबर : कौशल्यविकास व स्वयंरोजगार विभाग, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० स्वयंसेवकांसाठी विशेष कार्यशाळा झाली.

मुख्य सांगता समारंभ—१७७ स्वयंसेवक, अधिकारी उपस्थित

दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी वर्धापन सप्ताहाचा मुख्य कार्यक्रम एचिव्हर्स कॉलेज हॉल, कल्याण (प.) येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
मा. उपनियंत्रक, सहाय्यक उपनियंत्रक, अधिकारी, कर्मचारी, उपमुख्य क्षेत्ररक्षक व स्वयंसेवक मिळून एकूण १७७ जण उपस्थित होते.

प्रमाणपत्र व ओळखपत्र वितरण

बॅच क्र. ०१/२०२५ ते ०७/२०२५ – प्रमाणपत्रे व ओळखपत्रे

बॅच क्र. ८ व ९/२०२५ – स्वयंसेवक/वाॅर्डन्स् यांना ओळखपत्रे

मान्यवरांचे भाषण व शुभसंदेश वाचन

प्रास्ताविक : श्री. अनिल गावित, सउनि
मार्गदर्शन : श्री. रमेश गोरे, उपमुख्य क्षेत्ररक्षक
अध्यक्षीय भाषण : मा. विजय जाधव, उपनियंत्रक

या प्रसंगी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, गृहसचिव व महासंचालक यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले.

सत्कार व आभारप्रदर्शन

काॅलेजच्या NSS प्रमुख श्रीम. मोटवाणी यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावर्षीचे DGCD Disc विजेते श्री. बिमल नथवाणी यांचा उपनियंत्रकांनी विशेष सत्कार केला.

कार्यक्रमासाठी विनामूल्य सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य भिवंडीकर सरांचे मन:पूर्वक आभार.
राष्ट्रगीतानंतर चहापानाने समारोप करण्यात आला.

क्षणचित्रे उपलब्ध
https://photos.app.goo.gl/isDtckR2465oQerJA
कार्यक्रमातील छायाचित्रे वरिष्ठांना सादर करण्यात आली असून Google Format Site वर उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!!

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!! कल्याण प्र...