Friday, 12 December 2025

चिपळूण तालुका आणि कुणबी समाजाचा चंद्रकांत निर्मळ नावाचा आणि निर्मळ मानाचा तेजस्वी तारा हरपला !!

चिपळूण तालुका आणि कुणबी समाजाचा चंद्रकांत निर्मळ नावाचा आणि निर्मळ मानाचा तेजस्वी तारा हरपला !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

चिपळूण तालुक्यातील वहाळ गावचे सुपुत्र कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा वरळीचे विद्यमान कार्य- तत्पर आणि सलग ३ वेळा अध्यक्ष आणि चिपळूण शाखेचे मार्गदर्शक, भारत सरकार सनदी अधिकारी मा. श्री.चंद्रकांत निर्मळ यांचे दिनांक १२/१२/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन. 

अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी वृत्त. त्यांच्या जाण्याने समाजातील एक उच्च पदस्त अधिकारी कुणबी समाजाने आणि चिपळूण तालुक्याने गमावला आहे. कुणबी समाज आणि चिपळूण तालुक्याची जी अपरिरिमीत हानी झाली आहे ती कधीच न भरून येणारी आहे. अतिशय हुशार, नेहमीच हसतमुख चेहरा, शांत आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा स्वभाव, असे हे उच्च शिक्षित नेतृत्व आज अचानक निघून गेले हे वेदनादायी आहे, दिनांक १० डिसेंबर २०२५ त्यांना चिपळूण शाखेच्या वतीने कुणबी समाजाचा मानबिंदू विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 

त्यांच्या देहाचे शवविशेदन सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे झाल्यावर त्यांचे पार्थिव BPT (वडाळा) हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले होते. त्यांची परदेशात असलेली मुलगी मुंबईमध्ये आल्यानंतर कै. श्री. चंद्रकांत निर्मळ सर यांची अंत्ययात्रा शनिवार दिनांक १३ डिसेंबर रोजी , संध्याकाळी ४:०० वाजता त्यांच्या मुंबई पोर्ट ट्रस्ट, बीपीटी कॉलनी, वरळी येथील राहत्या घरून निघणार असून शिवाजी पार्क स्मशान भूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

त्यांच्या जाण्याने समाजातील एक उच्चपदस्थ, अभ्यासू, सर्वसमावेशक आणि शांत नेतृत्व आपण गमावले आहे आणि कुणबी समाजात दुःखाचे वातावर आहे. नेहमी हसतमुख, सर्वांना विश्वासाने सोबत घेऊन चालणारा त्यांचा स्वभाव अनेकांना कायम प्रेरणा देणारा आहे. वहाळ पंचक्रोशीतील, चिपळूण तालुक्यातील आणि स्तरातून दुःख व्यक्त करत, कुणबी समाजात त्याच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी होऊन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

No comments:

Post a Comment

ह.वि. पाटील हायस्कूलमध्ये कायदेविषयक व सुरक्षा मार्गदर्शन सत्र संपन्न !!

ह.वि. पाटील हायस्कूलमध्ये कायदेविषयक व सुरक्षा मार्गदर्शन सत्र संपन्न !! चिंचघर | प्रतिनिधी ह.वि. पाटील हायस्कूल, चिंचघर येथे सख...