Friday 29 May 2020

प्रत्येक प्रभागात १० रुग्णवाहिका तैनात करणार; टाटा आमंत्रा आणि डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोनाची विनामूल्य चाचणी !

प्रत्येक प्रभागात १० रुग्णवाहिका तैनात करणार; टाटा आमंत्रा आणि डोंबिवली येथील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कोरोनाची विनामुल्य चाचणी. 

_पालिका आयुक्त -डॉ . विजय सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहीती_


कल्याण , प्रतिनिधी - कोरोना साथीच्या पार्श्वभूमिवर महापालिका करीत असलेल्या उपाययोजनांसंदर्भात माहिती देणेकामी महापौर विनिता राणे व पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सायंकाळी पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .या पत्रकार परिषदेत महापालिकेने कोरोनाच्या प्रादुर्भावावर उपाययोजना करणेसाठी महापालिकेचे डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय (36 बेड्स + 6 आय.सी.यू.बेड्स) हे डेडिकेटेड कोवीड सेंटर म्हणून जाहिर केले असून, या व्यतिरिक्त बाज आर.आर.हॉस्पिटल डोंबिवली (56 बेड्स), निऑन हॉस्पिटल, कल्याण शिळरोड (28 बेड्स) आणि होलिक्रॉस हॉस्पिटल कल्याण पश्चिम (70 बेड्स) यांचेशी सामंजस्य करार केलेला आहे.

सद्याच्या परिस्थितीमध्ये महापालिकेत डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे महापालिकेने आय.एम.ए., निमा, कॅम्पा या संस्थांमधील डॉक्टरांचे सहकार्य मिळविले आहे.दिनांक ९ एप्रिल, २०२० पासून महापालिकेने तापाचे दवाखाने सुरु केले असून, सदर दवाखान्यात तापाचे क्रिनिंग सुरु केले असल्याची माहिती आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली.

महापालिकेचे पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी १० तापाचे दवाखाने सुरु केले असून पालिकेच्या कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय, डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय आणि टाटा आमंत्रा येथील रुग्ण यांची कोविड तपासणी महापालिकेमार्फत मोफत करण्यात येते. असल्याचे पालिका आयुक्त यांनी यावेळी सांगितले.

मेट्रोपोलिस लॅबने देखील दहा हजार कोवीड-१९ च्या मोफत चाचण्या करुन देण्याचे मान्य केले आहे, तसेच शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजना सामंजस्य करार केलेल्या तीन दवाखान्यांनाही लागू करण्यात आलेली असल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगीतले .

पॉझिटिव्ह रुग्णाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टची तपासणी केली जाते आणि ९५ टक्के केसेस आयसोलेट केलेल्या व्यक्तींमधून सापडतात अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

महापालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे रुग्ण आल्यावर त्याची तपासणी करावी सदर रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली तरच असा रुग्ण महापालिकेकडे संदर्भित करावा आणि त्यांचे रुग्णालयात विलगीकरणासाठी जागा निश्चित करावी अशा सूचना रुग्णालयांना दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

रुग्णवाहीकांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे महानगरपालिकेने आर.टी.ओ.कडे १०० रुग्ण वाहिकांची मागणी केली असून प्रत्येक प्रभागात १० रुग्णवाहीका उपलब्ध रहातील तसेच सदर रुग्णवाहीकांवर व्हेईकल ट्रॅकींग सिस्टिम बसविली जावून त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर दिला जाणार असल्यामुळे रुग्णवाहीका कुठे कार्यरत आहे याची माहिती/लोकेशन मिळू शकेल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

या व्यतिरिक्त महापालिका परिवहन सेवेच्या दोन मिनीबसचे रुपांतर रुग्णवाहीकेत करण्यात आले असून अशा एकुण १० मिनी बसचा वापर रुग्णवाहीका म्हणून करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.महापालिका पथकांमार्फत घरोघरी सर्व्हेक्षणाचे काम सुरु असून सुमारे ८.३० लाख नागरीकांचे सर्व्हेक्षण केले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.महापालिकेने २४X७ यावेळेत वॉर रुम स्थापन केली असून यातील हेल्‍पलाईन क्रमांकाद्वारे लोकांना सर्व प्रकारची माहिती पुरविली जाते.

GIS मॅपिंग प्रणालीद्वारे चार कोविड रुग्णालयांमधील बेड्स ची उपलब्धता, दाखल झालेल्या व डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची आकडेवारी, हॉट्सपॉट एरियाबाबतची माहिती डॅशबोर्डद्वारे दर्शविली जाते. असे प्रतिपादन पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...