घंटागाडी कर्मचारी वर्गास गोसावी परिवाराचा एक हात मदतीचा..
"धान्य वाटून केला वाढदिवस साजरा"
नासिक (अण्णा पंडित) सध्या कोरोनाचे संकट हे संपूर्ण जगावर आहे व दिवसेंदिवस हे वाढत चालले आहे. शासन कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच पाचव्या याकरिता लॉकडाऊनची घोषणा ही करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत आपली देश सेवा करणारे डॉक्टर
पोलिस व मनपा सफाई कर्मचारी,पत्रकार, हे अहोरात्र सेवा देत आहेत.
तसेच आपल्या परिसरातील रोज नियमित येणारे व आपला कचरा गोळा करून घेऊन जाणारे आरोग्य कर्मचारी देखील आपल्या प्राणाची पर्वा न करता सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत कचऱ्याच्या गाडीत कचरा विलगीकरणाचे काम करताना आपणास दिसून येतात. आपण कचरा टाकताना देखील तोंडाला रुमाल बांधून जात असतो मात्र हे कर्मचारी दिवसभर या दुर्गंधी मध्ये काम करत असतात.
ही पण आपलीच माणसे आहेत. याच अनुषंगाने ही गंभीर बाब लक्षात घेता नाशिक पाथर्डी फाटा परिसरातील गोसावी परिवारातील चित्रा गोसावी यांनी आपला 50 वा वाढदिवस साजरा करताना या कर्मचारी वर्गास मदतीचा हात पुढे केला. व त्यांना एक महिन्याचे किराणा धान्य वाटप करण्यात आले. आपण देखील समाजाप्रती संवेदनशील आहोत आपण समाजाचे देणेकरी आहोत. हे समाजभान जाणून पत्रकार योगेश गोसावी यांच्या मातोश्री चित्रा गोसावी यांनी आपला 50 वा वाढदिवस सफाई कामगारांना एक महीना पुरेल एवढे धान्य वाटून अनोख्या पद्धतीने साजरा केला. चित्रा गोसावी आणि त्यांचे पती दिनकर गोसावी समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व असुन त्यांच्या या समाजकार्याचे कौतुक समाज माध्यमातून होत असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
_______________________
No comments:
Post a Comment