Sunday 31 May 2020

आदिवासींच्या नशीबी डबऱ्याचे पाणी, करोडोंच्या पाणी योजना कुचकामी, शहापूर तालुक्यातील भवायह स्थिती?

आदिवासीच्या नशीबी डब-याचे पाणी, करोडोच्या पाणी योजना कुचकामी, शहापूर तालुक्यातील भयावह स्थिती?




कल्याण (संजय कांबळे) धरणांचा तालुका, नद्यांचा गाव अशी ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई दिवसेंदिवस उग्र रूप धारण करित असून जंगल आणि नद्यांचा राजा माणला जाणारा आदिवासी समाज आज हंडाभर पाण्यासाठी कोरड्या ठक्क नदीच्या पात्रात छोटे डबरे खोदून पाणी मिळवत असून त्यामुळे करोडो रुपये खर्च करून विविध प्रकारच्या पाणी योजना नेमक्या कोठे आणि कोणासाठी राबविण्यात आल्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

ठोणे जिल्ह्यातील शहापूर तालुका नेहमीच टंचाई ग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. भातसा सारखे मोठे व अनेक छोटेमोठे धरणे या तालुक्यात आहेत. येथील पाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, आदी शहरांना पुरविले जाते पण नदीच्या काठावर वसलेले अनेक गावे. वाड्या वस्त्या आजही कोरड्या आहेत या लोकांची पाणी टंचाई दूर व्हावी म्हणून शासनाकडे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, विंधन विहिरी व कुपनलीका घेणे, नळ पाणीपुरवठा योजनांची विषेश दुरुस्ती, नवीन योजना गाळ काढणे आदी विविध प्रकारच्या योजनांवर करोडो रुपये खर्च केले. पण आजही महिलांच्या डोक्यावरिल हंडा हटला नाही. त्यामुळे या योजना कुचकामी ठरल्या की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहापूर तालुक्यात ११० ग्रामपंचायत आहेत तर २३७ गावे आहेत यातील अनेक गावे आणि वाड्या वस्त्या पाडे पाणी टंचाई भयानक आहे
या तालुक्यातील काळू नदीचे काठावर वसलेल्या वाघेवाडी ही आदीवाशी वस्ती मड गावापासून हाकेच्या अंतरावर आहे. गावात नळ योजना, बोअरवेल आहे. पण ही वाडी या पासून कोसो दुर ना नळ योजना ना बोअरवेल, काळू नदीच्या पात्रात छोटे छोटे डबरे खणायचे आणि त्यात जमा झालेले पाणी गाळून हंडा भरायचा, ना टिसीएल ना शुध्दिकरण यंत्रणा, या पाण्यावरच जीवन जगायचे, घोटभर पाण्यासाठी तासोनतास डबके कधी भरेल याची वाट बघत बसायचे, शुध्द पाणी म्हणजे काय? ते कसे असते? हेच यांना माहिती नाही. गावातील पुढा-याना बोअरवेल किंवा आमच्या वाडिला नळ कनेक्शन द्या म्हटल्यावर तुम्हाला त्यांची काय गरज, नदी आहे ना तूमच्या साठी अशी उतरे दिली जातात असे डब-यातून पाणी पिणारे शांताराम जाधव, तुकाराम जाधव,, श्रीमती भुरी संजय टोपले या आदीवाशीनी सांगितले तसेच केवळ पावसाळ्यात नदी भरल्याने मनसोक्त पाणी मिळते पण उन्हाळ्यात नदी आटत असल्याने असे नदीत डबरे काढून पाणी भरले जाते असेही ते म्हणाले.
विशेष म्हणजे दरवर्षी प्रत्येक तालुक्यात पाणीटंचाई विभाग संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यामध्ये योजनांवर लाखोंच्या खर्चाची तरतूद केली जाते ती कोठे जाते, की केवळ योजनांचे कागदी घोडे नाचवले जातात. यावरुन पाणी नक्की कुठे मुरते, पैसा कुठे जिरतो याचा प्रत्येकाने शोध घ्यायला हवा, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विचार केला तर प्रश्न पडतो खरेच शहापूर, मुरबाड, कल्याण अंबरनाथ तालुक्यात "विकास" झाला आहे? 

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...