Tuesday 2 June 2020

कल्याण खाडी किनारी असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे तहसीलदाराने आवाहन !

कल्याण खाडी किनारी असलेल्या गावांना सतर्क राहण्याचे तहसीलदारांचे अवाहन!



कल्याण (संजय कांबळे) निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मुंबई समुद्र किना-या लगत असलेल्या परिसराला तसेच पालघर, डहाणू या भागाला देखील बसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे 'त्याच धर्तीवर मुंबई ला लागुण असलेल्या कल्याण खाडीच्या किनाऱ्याजवळ गावांनी सतर्क रहावे असे अवाहन कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे.
निसर्ग चक्रीवादळ मुंबई किना-याला धडकणार असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील मुंबई सह रत्नागिरी, रायगड, येथील हरेहरेश्वर, हर्णे तसेच पालघर, अर्नाळा येथे देखिल वादळाचा व नंतर येणाऱ्या अतिमुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या धर्तीवर परिसरात एन डि आर एफ ची टिम पाठविण्यात आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी कल्याण खाडी किनारी असलेल्या मांडा, अटाळी, गुरवली, नांदटर, गंधारी, सांगे किरवली, पिसाडॅम, सांगोडा, को ढेरी, वासुद्री, मोस, चौधरपाडा, बापगाव, पिंपळास, देवरुंग, आदी गावांना सावध रहाण्याचा व कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे मला तहसीलदार दीपक आकडे यांनी केले आहे. ं
ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुका हा महत्त्वाचा तालुका आहे तालुक्याच्या पश्चिमेस ठाणे, भिवंडी, उत्तरेला शहापूर भिवंडी, पुर्वेस शहापूर मुरबाड तर दक्षिणेस उल्हासनगर व रायगड जिल्हाची हद्द आहे मुंबई पासून केवळ 45 कि मी अंतर असून कल्याण शहराच्या पश्चिम भागालगत व भिवंडी तालुक्याचे पुर्व भागालगत आणि डोंबिवली, दिवा भागालगत खाडी आहे. त्यामुळे या सर्वांनी सतर्क व सावध रहावे असे अवाहन केल्याचे तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...