Tuesday, 2 June 2020

एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा: भाई जगताप.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा: भाई जगताप.


मुंबई - एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे.शासनाकडून काढलेल्या परिपत्रकाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली आहे.

एसटी महामंडळाचे राज्यभरात एकूण ३१ विभाग असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी परिपत्रके काढायला हवी होती, मात्र महामंडळाने असे केले नाही. उलट प्रत्येक विभाग मनमानी परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांना कर्तव्यांवर हजर होण्यास सांगतिले जात आहे. त्यामुळे एसटी महामंडळात अनेक ठिकाणी विसंगती दिसून येत असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहें. परिणामी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.तसेच कोरोनामुळे बिघड्लेले आर्थिक चक्र पुन्हा मार्गावर आणण्यासाठी एक वर्ष कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढतीस शासनाने स्थगिती दिली आहे. मात्र एसटी महामंडळाकडून या मुद्द्यांवर अद्याप परिपत्रक काढण्यात आले नसल्याची माहिती त्यांनी दिली.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या विभागासाठी शासनाकडून आदेश काढण्यात आले होते. ज्यात फिजिकल डिस्टसिंग पाळण्यासाठी सूचना दिल्या होत्या. तसेच कर्मचाऱ्यांना कामावर बोलविण्यासाठी अटी आणि शर्ती देण्यात आल्या होत्या. मात्र या शासनाच्या परिपत्रकाकडे एसटी महामंडळाच्या कर्मचारी वर्ग खात्याने दुर्लक्ष केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना पाच वर्षाखालील मुले आहेत किंवा ज्या कर्मचाऱ्यांना कर्करोग, मधुमेह आणि ब्लडप्रेशर सारखे आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलू नयेत, असे आदेश असताना सुद्धा एसटी महामंडळाकडून शंभर टक्के कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्यभरातील आगारात कर्मचाऱ्यांनी गर्दी होत आहे.यामुळे सोशल डिस्टिन्सिंगचे पूर्णता तीन तेरा वाजले आहे. तसेच कामावर हजर होणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना काम मिळत नाही.त्यामुळे कर्मचाऱ्यांना दूरवरून येऊन पुन्हा घरी परत जावे लागत आहे. एसटी महामंडळाच्या या ढिसाळ नियोजनामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे जगताप यांनी सांगीतले .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने अनेक परिपत्रक काढली आहेत. मात्र या सर्व परिपत्रकांना एसटी महामंडळाकडून केराची टोपली दाखवली जात आहे.परिपत्रकातील नियमांचे पालन मंडळाकडून केले जात नाही. यामुळे कामगारांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने भाविक भक्तांना प्रसाद वाटप‌ !!

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने भाविक भक्त...