हार्दिक पांड्या लग्नाआधीच 'बाप' होणार,सोशल मीडियावरुन दिली माहिती.
नवी दिल्ली - इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या लग्नाआधीच बाप होणार आहे.
हार्दिक पांड्याने त्याची होणारी बायको नताशा स्टानकोविचसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आहे.
नताशाच्या पोटावर हात ठेवलेला फोटो टाकून हार्दिक पांड्याने तो बाप होणार असल्याची माहिती दिली आहे.
हार्दिकने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,नताशा आणि माझा एकमेकांसोबतचा प्रवास खूपच चांगला होता.आता हा प्रवास आणखी चांगला होणार आहे. आमच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
No comments:
Post a Comment