Saturday, 27 June 2020

कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच आणि जेष्ठ शिवसैनिक नारायण पावशे यांचे निधन!

कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच आणि जेष्ठ शिवसैनिक नारायण पावशे यांचे निधन!


कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाणा-या कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच आणि शिवसेनेचे जेष्ठ शिवसैनिक नारायण जनार्दन पावशे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते.


काही दशकापूर्वी कल्याण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. यामध्ये कांबा गावचे शिवसेनिक नारायण पावशे यांचे नाव आदराने घेतले होते. माझी कामगार मंत्री शिवभक्त कै शाबीरभाई शेख यांचे खंदे आणि कट्टर समर्थक म्हणून नारायण पावशे यांचे कडे पाहिले जात होते. म्हारळ वरप आणि कांबा या स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन झाल्या नंतर सन २००० साली ते कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच झाले होते. यावेळी त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली त्यामुळे ते परिसरात लोकप्रिय सरपंच म्हणून परिचित होते.
पंरतु गेल्या दोन, तीन वर्षांपूर्वी त्यांच्या लहान भाऊ दिपक पावशे यांचे निधन झाले आणि हा मोठा धक्का त्यांना बसला. तेव्हा पासून ते वेगवेगळ्या आजाराने आजाराने त्रस्त झाले होते. चार दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे
कांबा ग्रामपंचायतीचे माझी सरपंच आणि मनमिळावू शांत स्वभावाचे नारायण पावशे यांचे निधनाने कांबा गावावर शोककळा पसरली आहे. 

No comments:

Post a Comment

"कोकण रत्न" पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन !!

"कोकण रत्न" पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन !! मुंबई (शांताराम गुडेकर) :           ...