Saturday, 20 June 2020

वरप येथील कोव्हीड केअर सेंटर आठ दिवसात चालू करा, जिल्हाधिकारी!

वरप येथील कोव्हीड केअर सेंटर आठ दिवसात चालू करा, जिल्हाधिकारी!


कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील वरप येथील राधा स्वामी संत्सग येथे कोव्हीड केअर सेंटर येत्या आठ दिवसांत सुरू करा अशा सूचना ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज वरप येथील भेटी दरम्यान तहसीलदार दीपक आकडे आणि गटविकास अधिकारी श्वेता पालवे व तालुका वैद्यकीय अधिकारी खामकर यांना दिल्या.
कल्याण तालुक्यातील कोरोना कोव्हीड 19 पाॅझिटिव पेंशंट ला भिवंडी अथवा कोन किंवा ठाणे येथे कोठेही दाखल करून घेतले जात नाही. मागील आठवडय़ात म्हारळ येथील महिला पेंशंट ला भिवंडी येथे न घेतल्यामुळे ती रात्री रिक्षा करून पुन्हा म्हारळ येथे आली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने तिला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. आज देखील म्हारळ परिसरात दोन कोरोना चे रुग्ण आढळून आले. परंतू त्यांना कोणीही दाखल करून घेत नव्हते, बेड फुल झाले अशी कारणे सांगितली जात होती.
अशातच वरप येथील राधा स्वामी संत्सग येथे कोव्हीड केअर सेंटर चालू करण्याचे "गु-हाळ" गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होते. पाहणी, दौरे, चर्चा, बैठका यापुढे गाडी सरकत नव्हती. कल्याण तालुक्यातील नांगरिकाना कोणी वालीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या विरोधात पत्रकारांनी मात्र सतत आवाज उठवल्यानंतर आज ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वरप येथील कोव्हीड केअर सेंटर ला भेट दिली. यावेळी ताडपत्री शेड, शौचालय, बाथरूम, पाणी पुरवठा, लाईट, फॅन, जेवणाची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, बेडची सोय, औषधे याबाबत ताबडतोब कामे पूर्ण करून येत्या आठ दिवसांत हे कोव्हीड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती रंजना देशमुख यांनी म्हारळ येथील कोरोना पाॅझिटिव रुण्गांना कोठेही घेतले जात नाही ही बाब जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी ताबडतोब या रुग्णाची सोय केली.
याप्रसंगी कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांनी सांगितले या कोव्हीड केअर सेंटर ला दोन इंचाची पाणी लाईन दिली असून या सेंटर साठी सुमारे 12/13 लक्ष रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कल्याण तहसीलदार दीपक आकडे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खामकर, सभापती रंजना केतन देशमुख, जिप सदस्या श्रीमती वैशाली शिंदे, बांधकाम विभागाचे उपअभियंता एस आर चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, म्हारळ पोलीस चौकीचे इन्स्पेक्टर बंजरंग रजपूत आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...