Friday, 12 June 2020

"शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे - भगवान भगत यांची मागणी"

"शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे  लक्ष  द्यावे - भगवान  भगत  यांची मागणी"
 
मुरबाड ( मंगल डोंगरे )
     ठाणे  जिल्ह्यातील  जिल्हा परिषदेच्या  शाळा  सुरु करण्याबाबत  जिल्हा  प्रशासनाच्या  हालचाली  सुरु झाल्या असल्याने शिक्षण विभाग प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला  प्रथम  प्राधान्य  देण्यात  यावे अशी  मागणी ठाणे जिल्हा  प्राथमिक  शिक्षक संघाचे अध्यक्ष  भगवान भगत  यांनी  ठाणे  जिल्हा  परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी  यांच्याकडे लेखी निवेदना द्वारे  केली  आहे . 
      ठाणे  जिल्ह्यातील  कोविड  १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता   प्रत्येक  तालुक्यात  कोरोनाचे  रुग्ण   मोठ्याप्रमाणात आढळून येत  आहेत . आता  तर  ग्रामीण भागातही  कोरोनाने  शिरकाव  केलेला  आहे . याच  वेळी
ठाणे जिल्हा परिषदेने  दि. ११/६/२०२० रोजी    पत्र काढुन  शिक्षकांना  शाळांवर  हजर  होऊन  शाळा स्वच्छता करणे  , पटनोंदणी  करणे  , व्यवस्थापन 
समिती  सभा घेणे  व  विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तके  वाटप करावीत  असे  आदेश  देण्यात  आलेले  आहेत . 
         याच  पाश्वर्भूमीवर  जिल्हा  शिक्षक  संघाने मुख्यकार्यकारी  अधिकारी  व  शिक्षणाधिकारी  याना  पत्र लिहुन  शैक्षणिक  वर्ष  २०२० - २१ सुरु  करण्यापुर्वी विद्यार्थ्यांच्या  सुरक्षिततेला  प्रथम  प्राधान्य  देणे, जिल्ह्यातील  सर्व  शाळांचे  निर्जंतुकीकरण  करणे, विद्यार्थ्याना  मास्क  व  सॅनिटायझर  पुरविणे ,  कोरोना संकट  हे  राष्ट्रीय  आपत्ती  असल्याने  शिक्षकांकडुन कोणत्याही  प्रकारचे  हमीपत्र  लिहुन  घेऊ  नये .   विद्यार्थ्यांना  कोरोनाची  लागण  झाल्यास  शिक्षकांना जबाबदार  धरु  नये  . शालेय  पोषाण  आहार  कोरड्या स्वरुपात  देण्यास  परवानगी  द्यावी  या  व इतर  अनेक मागण्या  करण्यात  आल्या  असुन  जिल्हा  परिषद उपाध्यक्ष  सुभाष  पवार  यांनाही  या  निवेदनाची एक प्रत देण्यात  आल्याचे  जिल्हा  सरचिटणीस  वसंत  पडवळ यांनी  सांगितले .

No comments:

Post a Comment

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!!

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.!! उरण दि २, (विठ्ठल...