गोवेली येथील जवानाची कोरोनावर मात, परिसरात आंनदी वातावरण!
कल्याण (संजय कांबळे) कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणे दिसत नसताना ही कोव्हीड 19 चा रिपोर्ट पाॅझिटिव आल्यामुळे दवाखान्यात भर्ती झालेला गोवेली येथील मुंबई महाराष्ट्र सुरक्षा दलातील जवान कोरोनावर मात करून नुकताच घरी परतला असून ग्रामस्थांनी आरती करुन याचे जोरदार स्वागत केले यामुळे परिसरात मात्र आंनदी वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण तालुक्यातील ग्रामीण अजून तरी कोरोनाचे संकटापासून दुर राहिला आहे. म्हारळ, खडवली येथील अपवाद वगळता इतरत्र याचा प्रादुर्भाव झाला नाही. परंतू अशातच मुंबई महाराष्ट्र सुरक्षा दलाचा गोवेली येथील जवान कोरोनोची लक्षणे नसताना कोव्हीड 19 चा रिपोर्ट पाॅझिटिव आला त्यामुळे काही काळ गोवेली परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू समजदार असलेल्या या जवानाने सुरुवातीपासूनच काळजी घेऊन सोशलडिस्टींग चे पालन केले होते. त्यामुळे याचा खूप फायदा झाला. भिवंडी येथील रुग्णालयात दाखल केले तरी तेथे या जवानाला कोणताही त्रास अथवा लक्षणे दिसून आली नाही. याच जोरावर त्यांनी कोरोवर मात केली. नुकताच या जवानाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तो गोवेली येथे पोहचताच नातेवाईक, मित्रमंडळी आणि ग्रामस्थांनी त्याचे जोरदार स्वागत केले. या चांगल्या बातमी मुळे परिसरात मात्र आंनदी वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment