Saturday, 13 June 2020

"वसई विरार : पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करुन रस्ते पुर्वरत करा - समीर वर्तक."

"वसई विरार : पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करुन रस्ते पुर्वरत करा - समीर वर्तक."


१३ जून २०२०, वसई - "11 वर्षांपासून रखडलेली वसईतील 69 गावांची पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करण्यासाठी व  पाईपलाईनसाठी खणलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ववत करण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीने वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे."

 *महाराष्ट्र सरकारतर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची* वसईतील 69 गावांची पिण्याच्या पाण्याची 85 कोटी रुपयांची योजना डिसेंबर 2008 रोजी मंजूर करण्यात आली. या योजनेचे 12 फेब्रुवारी 2009 रोजी भूमिपूजन झाल्यापासून सध्या जून 2020 चालू आहे . परंतु ही योजना नजीकच्या भविष्यात पूर्ण होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही. आतापर्यंत ही योजना पूर्ण करण्याच्या अनेक तारखा देण्यात आल्या अगदी मा. मुंबई उच्च न्यायालयाने या योजनेसंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर आदेशही दिले परंतु ही योजना काही पूर्ण होऊ शकली नाही.

ही 69 गावांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली तेव्हा ह्या 69 गावांमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात होत्या. आणि 3 जुलै 2009 रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यावर ह्या 69 गावांमधील बरीच गावे महानगरपालिकेत घेण्यात आलेली आहेत. त्यामुळे ही योजना *महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वसई विरार शहर महानगरपालिका संयुक्तरित्या राबवित आहे. *महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तसेच नगर अभियंता, महानगरपालिका* यांनी दिलेल्या लेखी माहितीनुसार सन 2017 मध्येच वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे या 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेची नळजोडणी झालेली असून मुबलक पाणीपुरवठा सुद्धा दिलेला आहे. जे संपूर्णपणे खोटे असून मागील एक वर्षांपासून या गावांमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम चालू असून ते अर्धवट सोडण्यात आलेले आहे तसेच त्या लेखी स्वरूपातील पत्रात 31 मार्च 2019 पर्यंत ही योजना पूर्ण करण्यात यावी असेही नमुद आहे.

या सगळ्या गोंधळामध्ये या 69 गावांमध्ये साधरण: 10 वर्षांपूर्वीच पाणी साठविण्यासाठी टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. त्यावेळी गावागावात प्लॅस्टिकसारख्या मटेरियलचे पाईपही टाकण्यात आले होते. या टाक्या बांधल्यापासून वापरात नसल्याने त्यांची कार्यक्षमता ही चिंतेची बाब असून पाईपलाईन तर कधीच नष्ट झालेली आहे. तसेच मागील वर्षी म्हणजेच सन 2019 मध्ये महानगरपालिकेने काही कोटी खर्च करून नव्याने पाईपलाईन टाकण्याचे काम चालू केलेले आहे. जवळपास एक वर्ष होत आलेले आहे परंतु अजूनपर्यंत ते काम पूर्ण झालेले नाही.

परंतु या दुसऱ्यादा टाकण्यात आलेल्या पाईपलाईनसाठी सर्वच गावातील प्रमुख रस्ते खोदण्यात आले. पाईपलाईन टाकून झाल्यावर बऱ्याच ठिकाणी हे रस्ते पूर्ववत करण्यात आलेले नाहीत. ज्यामध्ये वसईतील *अर्नाळा-निर्मळ-वसई हा राज्य महामार्ग असून या सर्व या रस्त्यातील वाघोली ते निर्मळ आणि वाघोली ते सोपारा* या रस्त्यावरील पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते मागील 10 महिन्यांपासून पूर्ववत केलेले नाहीत. या खोदलेल्या रस्त्यांवर सातत्याने अपघात होत असून वाहतुकीसाठी प्रचंड प्रमाणात अडथळे निर्माण झालेले आहेत. या पावसाळ्यात अजूनही हे रस्ते खचले जातील आणि या खचलेल्या रस्त्यांमुळे भीषण अपघात घडण्याची शक्यता आहे.

वसईतील या *69 गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना मागील 10 वर्षांपासून का  कार्यान्वित होत नाही ? सन 2017 पासून या 69 गावांना मुबलक प्रमाणात पाणी देण्यात येते मग ते पाणी प्रत्यक्षात कुठे जाते ? याची आपल्या स्तरावरून योग्य चौकशी करून लवकरात लवकर ही योजना चालू करून *69 गावांतील पिण्याच्या पाण्यापासून* आम्हा वंचित जनतेला न्याय द्यावा. तसेच ज्या जबाबदार अधिकाऱ्यांमुळे ही योजना आत्तापर्यंत चालू होऊ शकली नाही त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी. तसेच पावसाळ्यापूर्वी पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते पूर्ववत करण्यात यावे आणि या कामात चालढकल केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदार व त्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, वाघोली ते निर्मळ आणि वाघोली ते सोपारा या रस्त्यावरील पाईपलाईनसाठी खोदलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी पूर्ववत न केल्यास जर या खड्डयामुळे अपघात घडल्यास, संबंधित ठेकेदार व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील अशी भूमिका समितीतर्फे घेण्यात आली असल्याचे पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक ह्यांनी जाहीर केले आहे.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...