सहाय्यक पोलीस आयुक्त, "मा. रमेश धुमाळ" यांना गृह मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून
"आंतरिक सुरक्षा सेवा पदक" जाहीर..
मुंबई :(अण्णा पंडीत)
कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रमेश धुमाळ यांना नुकतेच गृहविभाग भारत सरकार यांच्या वतीने 'आंतरिक सुरक्षा सेवा पदक' जाहीर झाले आहे.
रमेश धुमाळ हे जून २०१२ मध्ये नाशिक येथील ट्रेनींग संपल्यानंतर त्यांना प्रोबेशन साठी चंद्रपूर जिल्हा येथे नेमणूक देण्यात आली होती. . चंद्रपूर चा काही भाग हाही नक्षलग्रस्त. त्यांनतर प्रोबेशन संपत आल्यावर त्यांना नागपूर येथील UOTC ( Unconventional Operation Training Centre) येथे प्रश्न विचारण्यात आला कि गडचिरोली येथे जाण्यासाठी कोण इच्छुक आहेत. त्यांच्यासह त्यांचे सहकारी मित्र शिवाजी पवार, अशोक थोरात आणि अशोक बनकर यांनी हात वर केले. त्यानंतर शिवाजी पवार यांनी लिखित अर्ज दिल्यामुळे त्यांना गडचिरोलीमध्ये पोस्टींग मिळाली. मात्र धुमाळ यांची पोस्टिंग बाळापूर अकोला येथे झाली. परंतू त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असल्याने त्यांना बऱ्याचदा आश्चर्यचकित अनुभव आले आहेत. दोनच महिन्यानंतर गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून रमेश धुमाळ यांचे नाव पोलीस महासंचालक कार्यालयाला कळवण्यात आले आणि त्यांची बदली गडचिरोली येथे जानेवारी २०१४. मध्ये झाली. अहेरी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून २०१४ ते सप्टेंबर २०१६ पर्यंत त्यांनी तेथे यशस्वीपणे कार्य केले.
आपले अनुभव कथन करतांना रमेश धुमाळ म्हणतात की, "जीवनाची किंमत काय असते हे गडचिरोली येथे सेवा केल्यावर कळते" गडचिरोली येथे पोस्टिंग झाल्यावर कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी त्यांनी LIC ची पोलिसी काढली होती. दक्षिण गडचिरोली मधील गट्टा जंबिया-पेंरीमिली पासून राजाराम खांदला, व्यंकटापुर पर्यंत सर्व प्रदेश त्यांनी पायी पालथा घातला. 'दोनवेळा नक्षल सोबत फायरिंग ही झाली.' त्यांच्या सुदैवाने ते वाचले आणि पळून गेले. रात्रीच्या अगदी काळ्याकुट्ट अंधारात ही गडचिरोलीच्या जंगलात धुमाळ यांनी ऑपरेशन्स केले. काही ऑपरेशन्स तर नक्सल पळून जातील म्हणून जंगलातून धावत जाऊन केले आहेत. १०-१२ जणांच्या टीमने खांद्यावर AK 47 घेऊन जंगलात बिनधास्त घुसायचे. नक्षल्यांचा शोध घ्यायचा आणि पुन्हा माघारी फिरायचे. तात्कालिन पोलीस अधीक्षक मा. सुवेझ हक साहेबांचा फोन आल्यावर त्यांच्या अंगामध्ये वेगळीच वीरश्री संचारायाची. हात आपसूक AK 47 कडे जायचे. साहेबांच्या शब्दात वेगळीच जादू असायची. असे भारावून जाऊन आपले अनुभव त्यांनी कथन केले आहेत.
जंगलातील नक्सलवादी जसे देशाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक तसेच शहरी भागात राहून नक्सलवाद्यांना मदत करणारे ही धोकादायकच असल्याचे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले. अशाच एका नक्सलवाद्याला जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेपर्यंत पोहचवण्यात मा. पोलीस महानिरीक्षक कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना यश आल्याचे सांगताना त्यांची छाती अभिमानाने फुगते. गडचिरोली सत्र न्यायालय,उच्च न्यायालय नागपूर आणि मुंबई, सर्वोच न्यायालय, दिल्ली या ठिकाणी अनेक वेळा जाण्याची संधी त्यांना सदर केस मुळेच मिळाली असल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्या दरमिसाधारणपणे १ लाख ७५ हजार कि.मी. एवढे रनींग त्यांच्या गाडीचे या केस साठी फिरण्याकरिता झाले होते. यावरून या केससाठी त्यांनी घेतलेले कष्ट लक्षात येतात.
गडचिरोलीमध्ये केलेल्या कामाचे शासनानेही खूप कौतुक केले. 2016 मध्ये DG INSIGNIA (पोलीस महासंचालकांचे पदक), 2018 मध्ये महाराष्ट्र गृहविभागाने "खडतर सेवा पदक" आणि आता 2020 मध्ये केंद्रीय गृहविभागाने "आंतरिक सुरक्षा सेवा पदक" प्रदान करुन योग्य योद्ध्याचा सन्मान केला आहे.
अशी भावना जनमानसातुन उमटत आहे.
रमेश धुमाळ यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असुन त्याचेवर विविध माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने सामाजिक अन्याय अत्याचारा विरुध्द लढणारी संघटना *अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य.* तसेच *श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य.* या सामाजिक संस्थाचे पदाधिकारी मा महेंद्र तथा अण्णा पंडित. रविंद्रदादा जाधव, प्रकाश संकपाळ, आदर्श भालेराव, संतोष चाळके, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चे सुनिल शिरीषकर आदिंनी त्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस या कर्तृत्ववान अधिका-यास शुभेच्छा दिल्या आहेत.
आखिर,
"खाकी की बात कुछ औरही है !"
'और उसपे सितारोंके साथ मेडल्स का क्या कहना !!!!'




No comments:
Post a Comment