ठाणे जिल्ह्यातील पंचायत समितीचे आरक्षण जाहीर कल्याण सर्वसाधारण महिला!
कल्याण (संजय कांबळे) ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह पाच पंचायत समितीचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून कल्याण पंचायत समिती ही सर्व साधारण महिला साठी राखीव तर शहापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग याठी राखीव पडला आहे. आज झालेल्या सोडतित हे आरक्षण जाहीर करण्यात आले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या सह कल्याण, भिवंडी शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ या पाच पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले यामध्ये ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष हा प्रवर्ग नागरिकांचा मागासवर्ग प्रर्वग महिला साठी राखीव झाला आहे तर पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षणामध्ये शहापूर पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जमाती महिला, अंबरनाथ अनुसूचित जमाती महिला, पंचायत समिती मुरबाड, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, कल्याण पंचायत समिती चे सभापती पद हे सर्वसाधारण महिला यासाठी राखीव पडले आहे तर पंचायत समिती भिवंडी चे सभापती पद सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे
यावेळी आरक्षणात काही बदल होतील असे वाटत होते. परंतू तसे झाले नाही. विशेष म्हणजे कल्याण चे आरक्षण बदललेल असे सर्वांना वाटत होते. पण काही बदल झाला नाही.
No comments:
Post a Comment