Thursday, 25 June 2020

बदलापूर मध्ये राष्ट्रवादीचे पडळकर ह्यांच्या फोटोला काळी शाही आणि जोडमार आंदोलन!

बदलापूर मध्ये राष्ट्रवादीचे पडळकर  ह्यांच्या फोटोला काळी शाही आणि जोडमार आंदोलन!


बदलापूर: अरूण ठोंबरे 
आज राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर कडून श्री  कालीदास देशमुख ह्यांच्या नेतृत्वाखाली  वाचाळवीर गोपचंद पडळकर  ह्यांच्या फोटोला काळी शाही आणि जोडमार आंदोलन करून  रस्त्यावर उतरून निषेध  केला
आमचे राजकारणातील दैवत श्री शरद पवार  ह्यांच्या वर खालच्या पातळीवर जाऊन वयक्तिक टीका करून आपलं राजकीय डमरू वाजवण्याचा  अयशस्वी प्रयन्त केला, शरद पवार साहेब हे देशातील नव्हे तर जगातील राजकीयदृष्ट्या मोठं नेतृत्व आहे ह्याचा विसर  ह्या नवख्या आमदारला पडला असावा. ह्यांचा बोलावीता धनी कोण आहे सर्व जाणतात, ह्या पुढे जर शरदचंद्रजी पवार साहेब किंवा अन्य कुठला आमच्या नेत्यावर कोणी टीका केली तर जशाच तसे उत्तर देण्यात येईन.


यावेळी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष ठाणे ग्रामीण अविनाश देशमुख, जिल्हा युवक उपाअध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सदश अनिशा खान, उपाध्यक्ष दिनेश धुमाळ, युवती अध्यक्ष सायली बळीद, एन डी पाटील, लक्ष्मण फुलवरे , पप्पू भोईर, सुनिद्र पगारे,  क्रांती पष्टे,ज्योती वैद्य  इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरण येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन !;

उरण येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन ! उरण दि ८, (विठ्ठल ममताबा...