Friday, 5 June 2020

तिप्पनानगर येथील विवाहित महिलेने गळफास लावून केली आत्महत्या ; घातपात असल्याचा बहिणीचा दावा!

तीप्पनानगर येथील विवाहित महिलेने गळफास लावून केली आत्महत्या
आत्महत्या नसून घातपात असल्याचा केला बहिणीने आरोप.


मोहोने : तिपन्नागर येथील विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सोनी कलेवानन (२८) या महिलेने घराजवळील झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती परंतु या घटनेला आता वेगळे वळण लागले आहे ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप तिची बहिण महालक्ष्मी नंबियार यांनी केला आहे.
मयत सोनी आणि कलेवानन सुब्रमण्यम त्यांचा प्रेमविवाह झाला असून या प्रेम विवाहास सासरच्या लोकांचा विरोध होता. सासरकडील लोक मयत सोनीला सतत मारहाण करीत असत.माझ्या मुलाचे लग्न तुझ्यासोबत झाले नसते तर माझ्या मुलाला 20 तोळे सोने आणि मोठा हुंडा मिळाले असता असे म्हणून तिला माहेर वरून पैसे आणायला सांगतं होते. कोणत्याही शुल्लक कारणावरून भांडण काढून सासु सुमती सुब्रमण्यम व सासरे सुब्रमण्यम सडीयन हे सोनीला भांडण काढून मारहाण करीत असत. ननंद कलसेल्वी आणि तिचा पती विरमणी हे दोघेही तिला सारखे टोमणे मारून शिवीगाळ करत असत सासरच्या लोकांनी तिला आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवस आगोदर खूप महाराण केली होती असे तेथील रहिवाशांनी सांगितले आहे. माझ्या बहिणीची आत्महत्या नसून तिला घरांमध्ये मारहाण करून गळा आवळून मारले आहे नंतर तिचा मृतदेह घराजवळील झाडाला ओढानीच्या साह्याने लटकविण्यात आला आहे असा आरोप महालक्ष्मी नंबियार यांनी पोलीस आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. माझ्या बहिणीचा पती जुगार खेळत असून अनेकदा घरातील दागिने व पैसे तो जुगारात हरत असे पैशासाठी कलेवानन व सासू सूमती सुब्रमण्यम सासरे सुब्रमण्यम व ननंद कलसेल्वी आणि नंदवी वीरमनी यांनीच सोणीला मारले असून त्यांची चौकशी करून पोलिसांनी नव्याने तपास करून संबंधित सासरच्या व्यक्तींवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी पीडित महिलेच्या बहिणीने लेली आहे. याप्रकरणी पोलीस काय भूमिका घेतात या कडे संपूर्ण मोहोने परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्भीड जागल्या पुरस्काराचे वितरण !!

कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन आणि निर्भीड जागल्या पुरस्काराचे वितरण !! मुंबई, पी. डी. पाटील (दि. २८/०४/२०२६) : मराठी वृत्तपत्र लेख...