भुसावळातून अज्ञात चोरट्यांनी 11 लाख लांबविले.
भुसावळ प्रतिनिधी :- शहरातील रजा नगर खडका भागातील डॉक्टर यांच्या बंद घराच्या बेडरूमच्या खिडकीचे लोंखडी ग्रील उचकावून 11 लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली असून
सविस्तर वृत्त असे की,शहरातील रजा नगर खडका भागातील फिर्यादी डॉ. सिलिंन मशहूर रजा सैय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डॉ.मशहूर रजा सैय्यद हे
दोघे पती-पत्नी पेशाने डॉक्टर असून
कामानिमित्त दिनांक 24/5/2020 ते 1/6/2020 या दरम्यान राहते घर बंद करून गेले असतांना अज्ञात चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीचे लोखंडी ग्रील उचकावून आत प्रवेश करून 10 लाख 30 हजार रुपये रोकड व 60 हजार 990 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व इतर वस्तू लांबविल्याची घटना घडली असून बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक मा. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली
बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि अनिल मोरे व पोना समाधान पाटील करीत आहे.


No comments:
Post a Comment