गावठी कट्टासह घरफोडी मधील फरार आरोपी भुसावळ बाजारपेठ शोध पथकाच्या ताब्यात!!
भुसावळ प्रतिनिधी :- येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिनांक 21 जून 2020 रोजी 3:30 वाजेच्या सुमारास भाग-5 गु.र.न.588/2020 भा.द.वि.कलम - 454, 457,380 प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फरार आरोपी 1)अलतमश रशीद शेख वय -21 राहणार जाम मोहल्ला भुसावळ 2)जहीर सलीमोद्दीन सय्यद वय-19 राहणार मुस्लिम कॉलनी भुसावळ याची मा.सहा पोलीस निरीक्षक श्री अनिल मोरे यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून सदर आरोपी यांना भुसावळ शहरातून जाम मोहल्ला भागातून सापडा रचून ताब्यात घेण्यात आले असून आरोपी क्रमांक (१) याची अंगझडती घेत असतांना तो झटपटी करू लागला त्याच दरम्यान त्याचे कमरेतून एक गावठी कट्टा बनावटीच्या पिस्टल खाली पडून एक राऊंड जामीनीच्या दिशेने फायर झाला असून कोणाला दुखापत झाली नाही आहे.तसेच त्यातून दोन जिवंत काडतुज व गावठी कट्टा हस्तगत करण्यात आले.
आरोपी क्रमांक (२) याच्या कडून एक चाकू हस्तगत करण्यात आली असून त्याचे विरुद्ध भुसावळ बाजारपेठ पो स्टे ला भारतीय हत्यार कायदा कलम -3/25, 3/27 प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री डॉ. पंजाबराव उगले, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन राठोड व मा.पोलीस निरीक्षक श्री दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे,पो ना किशोर महाजन, समाधान पाटील, रमण सुरळकर,रविंद्र बिऱ्हाडे, महेश चौधरी, तुषार पाटील, उमाकांत पाटील,पो कॉ विकास सातदिवे, श्रीकृष्ण देखमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी अशांनी केली आहे.


No comments:
Post a Comment