समाजसेवक राजु रणदिवे यांच्या पुढाकाराने अशोक नगर वालधुनी प्रभागात अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप..
कल्याण (अण्णा पंडित) ओएनजीसी आणि अॉल इंडिया एससी /एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन. ओएनजीसी लि.मुंबई. आणि एबीएम समाज प्रबोधन संस्था, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आज सम्राट अशोक नगर वालधुनी कल्याण येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी AISCSTEWA ONGC Ltd Mumbai. चे चेअरमन आणि मुख्य प्रबंधक जगेश सोमकुंवर, AISCSTEWA ONGC Ltd. चे रिजनल व्हाईस प्रेसिडेंट व्ही.टी.वानखेडे, AISCSTEWA ONGC Ltd.चे सेंट्रल वर्किंग कमिटी एक्झिक्युटिव्ह मेंबर आणि मुख्य अभियंता व्ही.यु.गायकवाड तसेच रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णा साहेब रोकडे यांच्या उपस्थित अशोक नगर वालधुनी प्रभागात नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.ओएनजीसी च्या वरील मान्यवर मंडळीनी आजवर राज्यात नव्हे तर देशातील अनेक ठिकाणी वंचित उपेक्षित व गरजु कुटुंबीयांना लॉकडाऊन च्या कालावधीत अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणात वाटप केले आहे.
अशाच परिस्थिती मध्ये आंबेडकरी चळवळीतील तरुण तडफदार व्यक्तिमत्त्व समाजसेवक राजू रणदिवे यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या प्रयत्नांतुन अशोकनगर वालधुनी प्रभागातील गरजु कुटुंबीयांना किमान महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
विशेष म्हणजे राजू रणदिवे यांचा लॉकडाऊन कालावधी मध्ये अपघात झालेला असताना सुद्धा माझ्या समाजातील लोक आज अडचणीत आहेत आपण त्यांची चूल पेटवली पाहिजे या सामाजिक जाणीवेतुन त्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये ओएनजीसी आणि त्यांच्या इतर अधिकारी वर्गाला सोबत घेऊन नागरिकांना मदत मिळवून दिली.
अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केल्यात्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच प्रभागामध्ये कौतुक होत आहे.
राहूल पगारे,मिलिंद घाटेसाव, सुधिर सोनवणे, वसंत सोनवणे, शशी उघाडे, हेमेंद्र अभंग, दिलिप साळवे, किशोर चंदणे, मयुर गुप्ता, मंगल पाठारे, मनोज दिवेकर, रवि कांबळे या कार्यकत्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने वाटपाची जबाबदारी पार पाडली.


No comments:
Post a Comment