कल्याण ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा शिरकाव, गोवेली येथे आढळला कोरोनाचा रुग्ण!
कल्याण (संजय कांबळे) कल्याण तालुक्यातील मध्यवर्ती अशा गोवेली गावात कोरोनाचा रुग्ण आढळून आला असल्याने आता ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. विशेष म्हणजे हा पेंशंट काही दिवसापूर्वी मुलांच्या मध्ये क्रिकेटचा सामना खेळत असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण मुरबाड आणि बदलापूर शहापूर मार्गावर मध्यवर्ती अशा ठिकाणी गोवेली हे गाव वसले आहे. विशेष म्हणजे येथे ग्रामीण रुग्णालय सुद्धा आहे. त्यामुळे हे महत्वाचे ठिकाण आहे याच गावातील एक तरुण मुंबई येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असून त्याचा कोरोना कोव्हीड 19 रिपोर्ट पाॅझिटिव आला असून आज दुपारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संपर्इकातील आठ जणांना बदलापूर येथे कोरोनटांइग करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे
तर हा तरुण काही दिवसांपूर्वी क्रिकेट च्या सामन्यात खेळला असून त्यामुळे चिंता वाढली आहे. या निमित्ताने आत्ता बरेच दिवस कोरोना पासून दूर राहिलेल्या ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला आहे

No comments:
Post a Comment