मुरबाड तालुक्याला धोक्याची घंटा ! कोरोना रग्ण संख्येत रोज होतेय वाढ!
मुरबाड {मंगल डोंगरे} : गेल्या तिन महिन्यापासून कोरोना मुक्त असणारा मुरबाड तालुका सध्या कोरोनाच्या विळख्यात येतो की काय अशी भिती निर्माण झाली आहे. आज मुरबाड तालुक्यात नव्याने एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ झालेली असून मडकेपाडा गावातील 25 वर्षीय तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. सदर तरुण एका खाजगी रुग्ण वाहिकेवर वाहन चालक असल्याची माहीती मिळते.
त्यामुळे आता या क्षणाला मुरबाड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ही 18 वर जाऊन पोहचलेली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत 8 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. तर एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 9 जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान मडके पाडा येथे कोरोना पाॕझिटिव्ह रुग्ण सापडल्याने ग्रामपंचायत साजई-मडकेपाडा यांनी गावात जंतूनाशक फवारणी करुन गावातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आव्हान केले आहे तसेच. मडके पाडा गाव प्रतिबंधित क्षेञ म्हणून घोषित केले असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment