Saturday, 25 July 2020

मुरबाड मध्ये कोरोनाचा वाढता आलेख तालुक्यात 255,तर शहरात 106,रुग्ण,आज ९ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ ;!

मुरबाड  मध्ये कोरोनाचा वाढता आलेख  तालुक्यात 255,तर शहरात 106,रुग्ण,आज ९ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ ;!


मुरबाड (मंगल डोंगरे) : कोरोनाचा मुरबाड तालुक्यातील आलेख दिवंसेदिवस वाढत असुन आज पर्यंत तालुक्यात एकूण रुग्णसंख्या २५५ वर पोहचली आहे.
मुरबाड तालुक्यात कोरोना बाधीत रुग्ण संख्या दिवसेंदिवस  वाढतच चालली असतानाच  कालच्या एकूण २४६ बाधीत रुग्ण संख्येत आज ९ नवीन रुग्णाची भर पडली असून आजची तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णसंख्या २५५ वर गेली आहे. आजच्या बाधीत ९ रुग्णांत  ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. तर आज एका जनाचा मृत्यू झाला आहे. तर मुरबाड नगर पंचायत क्षेत्रातील बाधीत रुग्णांची संख्या १०६ वर धडकल्याने मुरबाड शहरातही कोरोनाने उसळी घेतल्याचे  चित्र दिसत आहे.तर आता पर्यंत ८ जणांचा मृत्यू कोरोनाने झालेला आहे.
मुरबाड तालुक्यातील  सरळगाव येथील २५ वर्षीय महिला व ३ वर्षीय मुलगा असे २ जण बाधीत आढळून आले आहेत त्याच प्रमाणे पवाळे येथील २६ वर्षीय पुरुष, देवगाव मराठी शाळेच्या मागे १३ वर्षीय महिला,सोनारआळी मुरबाड येथील ६२ वर्षीय पुरुष, कुंभारआळी मुरबाड येथील ६२ वर्षीय पुरुष,तर पोलीस कॉलनी मुरबाड येथील अनुक्रमे ३९,३०,३५  असे तीन जण आज कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्या मुळे एकूण बाधीत रुग्णांची संख्या २५५ वर जाऊन पोहचली आहे.
आज एकूण ९ जण कोरोना पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.तर १३ जणांचे मेडिकल अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मुरबाड तालुक्यातील उपचार सुरू असलेल्या बाधीत रुग्णांची संख्या ६७ आहे.तर १८० जण उपचार घेऊन  बरे झाले आहेत. आज तालुक्यातील २६ जंनाचे स्व्यबचे नमुने घेण्यात आले असून ५५ जंनाचे मेडिकल रीपोर्ट प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील ४९ ठिकाणे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केल्याचे आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...