Tuesday 28 July 2020

शिरवली येथील नवीन इमारतीचे उपाध्यक्षांच्या हस्ते उदघाटन !

शिरवली येथील नवीन इमारतीचे उपाध्यक्षांच्या हस्ते उदघाटन !


मुरबाड (मंगल डोंगरे ):
    विध्यार्थ्यांना घडविण्यासाठी तसेच शिक्षणाचा विस्तार व्हावा या उद्देशाने शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती घडविण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत नवीन योजना आणून विध्यार्थ्यांना शैक्षणिक द्रुष्ट्या  सक्षम बनविणार असे उद्गार ठाणे  जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती सुभाष पवार यांनी काढले आहेत.ते मुरबाड तालुक्यातील शिरवली येथील दोन नवीन वर्गखोल्या उदघाटन समारंभात उदघाटक म्हणून बोलत होते.
   ठाणे जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपली धडपड असल्याचेही त्यांनी नमूद केले.उपाध्यक्ष पदाचा कार्यभार हातात घेतल्यानंतर शाळांना शौचालयसाठी वीस हजार रुपये,शाळांना संरक्षण भिंत आणि मोडकळीस आलेल्या 300 शाळांना सुमारे 16 कोटी दुरुस्तीसाठी आणि 22 कोटी नवीन वर्गखोल्याना निधी दिला.जिल्ह्यातील सर्व शाळा या सीसीटीव्ही कक्षेत आल्या पाहिजेत तसेच स्पर्धा परीक्षेतही मुलांची गुणवत्ता दिसून यावी त्या दृष्टीने आपला प्रयत्न चालु असल्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.मुरबाड तालुक्यातील कोरोना रुग्ण आटोक्यात आल्यास शासनाचा आदेश न आल्यास जिल्हा परिषद मार्फत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
    शिक्षणाबरोबर समाजकल्याण योजना,शेष फंड,3054,5054 या योजनातुनही तालुक्याच्या विकासासाठी निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.यावेळी सभापती श्रीकांत धुमाळ,स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामभाऊ दळवी,मा.उपसभापती अनिल देसले, जि प सदस्य किसन गिरा,सरपंच हौसाबाई बांगारा,विस्तार अधिकारी लंबाते,संजय घागस, जगन घागस,रमेश घागस आदींसह शिक्षक उपस्थित होते.

1 comment:

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...