'वरुणराजा रुसल्याने बळीराजाची चिंता वाढली, चांगले पीक येऊनही पाण्याअभावी धोका'?
कल्याण (संजय कांबळे) : शेतीचा खरीप हंगाम २०२० /२१ साठी जिल्हा परिषदेच्या सेस ५० टक्के अनुदानावर देण्यात येणारे भात बियाणे आता कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागात न देता ते आपल्या गावातील /तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात देण्यात आले, शेतकऱ्यांनी
चांगला पाऊस पडल्याने जुलै च्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात भात लावणी कशीतरी पुर्ण केली. पीकही चांगले आले. पण पाऊसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.
देशात कोरोनोच्या वाढत्या धसक्याने लाॅकडाऊण लागू करण्यात आले आहे. तरीही शेतीच्या कामांना यातून पुर्ण पणे वगळण्यात आले आहे. पावसाळा तोंडावर आला आहे त्यामुळे आता खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे औषधे आदी वेळेवर मिळण्यासाठी शासनाने विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये जि प सेस योजना २०२०/ २१,शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे, बांधबंदिस्ती, ७५ टक्के अनुदानावर स्प्रे पंप, ताडपत्री, सुधारित अवजारे, सिंचन साहित्य, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड योजना, आंबा, नारळ, सिताफळ, आवळा आदी योजनांचा समावेश आहे.
कल्याण तालुक्यात ५ हजार १०० हेक्टर क्षेत्रात भाताचे पीक घेतले जाते तर १५० हैक्टर क्षेत्रात भाजीपाला लागवड केली जाते कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कार्यालयात यापूर्वी शेतकऱ्यांना भात बियाणे उपलब्ध होत होते. पण सध्या कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे, आणि कोरोनोचा फैलाव होऊ नये म्हणून भात बियाणे जया १२० क्विटंल, कर्जत ३:१० क्विंटल, श्रीराम ३० क्विंटल, उपलब्ध करून देण्यात आले आहे परंतू ते तालुक्यातील नागाव, नारिवली, वाकळण, खोणी, बापसई, कांबा, गुरवली, खडवली, काकडपाडा, फळेगाव, वसत शेलवली या अकरा ग्रामपंचायती मध्ये वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे याला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
लाॅकडाऊण मुळे भात लावणीच्या कामासाठी मजूर मिळत नव्हते. तरीही हवातो दर देऊन स्थानिक मजूरांना घेऊन भात लावणी पुर्ण केली. यावेळी सुदैवाने पीकही चांगले आले आहे. काही शेतकऱ्यांनी युरिया खताची मात्रा पण दिली. त्यामुळे भाताला काळोखी आली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. ज्या ठिकाणी वल आहेत तेथील शेतात पाणी साचले पीक बरे आहे. पण जिथे पाणी नाही तेथील पिकांना पाऊस हवा आहे.
२६आणि २७ जुलै हे पावसाचे हमखास दिवस. पण हेही कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. अगोदर कोरोनोच्या संकटामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांची शेतीवर मदार आहे. त्यामुळे वरुणराजाने रुसवा सोडून बळीराजा वर कृपादृष्टी करावी अशी प्रार्थना शेतकरी करित आहे.
No comments:
Post a Comment