Sunday, 3 August 2025

पावसाळी भव्य रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा चेंबूर येथे संपन्न !!

पावसाळी भव्य रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा चेंबूर येथे संपन्न !!

** श्री राजकोजी रेवाळेवाडी, आंगवली झाला विजेता संघ तर मोरया तळेकांटे, कालिश्री आंबवठरला उपविजेता

मुंबई (शांताराम गुडेकर/अजित गोरुले) :
             रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्या मधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु.पो.आंगवली येथील श्री राजकोजी रेवाळे वाडी, आंगवली यांच्यावतीने रविवारी (दि. ३ ऑगस्ट) भव्य पावसाळी रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा  गांधी मैदान, चेंबूर, मुंबई येथे यशस्वीरित्या पार पडल्या.
            या स्पर्धेत एकूण १२ संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.स्पर्धेचे उद्घाटन  मार्गदर्शक श्री.अमित रेवाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. खेळीमेळीच्या झालेल्या या स्पर्धेत राजकोजी रेवाळेवाडी, आंगवली हा संघ विजेता ठरला. विजेत्या संघाला पारितोषिक म्हणून १२०००/- रुपये आणि आकर्षक चषक श्री. अमित रेवाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर उपविजेता संघ  म्हणून मोरया तळेकांटे, कालिश्री आंबव यांना पारितोषिक म्हणून ८०००/- रुपये आणि आकर्षक चषक श्री.सचिन रेवाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. वैयक्तिक गौरव म्हणून मालिकावीर- समीर बंडबे, उत्कृष्ट फलंदाज- शुभम कुळे, उत्कृष्ट गोलंदाज- संतोष, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक- प्रथमेश सांडिम यांना सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे  उपस्थित असलेले श्री. अमित रेवाळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना आयोजकांचे आणि मार्लेश्वर पंचक्रोशी क्रिकेट समिती ग्रामीण व मुंबई शाखा यांचे विशेष आभार मानले. आयोजकांच्या वतीने श्री.अमित रेवाळे यांनी विजेता संघ आणि खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...