Sunday, 3 August 2025

राष्ट्रीय चर्मकार महासंघ ठाणे जिल्हा यांचा मुरबाड दौरा संपन्न...

राष्ट्रीय चर्मकार महासंघ ठाणे जिल्हा यांचा मुरबाड दौरा संपन्न...

मुरबाड, (महेंद्र उर्फ अण्णा पंडीत) : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री बबनराव घोलप, प्रदेशाध्यक्ष डॉ शांताराम कारंडे  यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली मुरबाड शासकीय विश्रामगृह सभागृहात संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे यांचे अध्यक्षतेखाली मुरबाड तालुका कमिटीची बैठक आयोजीत करण्यात आली होती.

सदर बैठकीमध्ये मुरबाड तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. श्री विलास कमलाकर जाधव यांची मुरबाड तालुका अध्यक्षपदी आणि शाम नारायण जाधव यांची ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. तोंडलीकर कॉलेजचे प्राचार्य राजू हरी रोकडे यांची मुरबाड तालुका सचिव पदी यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही एक अराजकीय संघटना असुन समाजाच्या तळागळातील घटकां पर्यत संघटना पोहचवुन समाजाच्या कल्याणासाठी काम करावे असे मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करुन ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे यांनी नवनियुक्त पदाधिका-यांचे  नियुक्ती पत्र तसेच शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी राम बनसोडे यांच्या सह उपस्थितांकडून शुंभेच्छा देण्यात आल्या.
या समयी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष राम बनसोडे यांचे सह आरपीआय मुरबाड तालुकाध्यक्ष श्री दिनेश उघडे, उपाध्यक्ष रमेश देसले, आरपीआय युवक मुरबाड तालुकाध्यक्ष धनंजय थोरात, लोक क्रांती संघटनेचे अध्यक्ष नरेश मोरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष भैरवनाथ वाघमारे, जिल्हा सरचिटणीस गजेंद्र राऊत, सोमनाथ राऊत, भिकाजी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव, प्रकाश जाधव, पत्रकार दिलीप पवार, चेतन पोतदार, सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे, चंद्रकांत चव्हाण, सुराडकर शिवाजी भिसे तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव देखील सदर बैठकीस उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...