कोरोनाबाधित रूग्णाला नेऊ नये म्हणून जमावाची पोलिसांवर दगडफेक !
राजापूर - कोरोनाचा रूग्ण घेऊन येण्यासाठी साखरी नाटे येथे गेलेल्या रूग्णवाहिकेला तेथील जमावाने विरोध केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. हा प्रकार कळल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या पोलिसांच्या गाडीवर जमावाने दगडफेक केली आणि त्यात काही पोलीस जखमी झाले आहेत.
साखरी नाटे येथील एका ३२ वर्षीय तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला आणण्यासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयाची रूग्णवाहिका बुधवारी सकाळी साखरी नाटे येथे गेली. मात्र तेथे अचानक जमाव जमला आणि जमावाने रूग्णाला नेण्यास मनाई केली.
जमाव आणि त्यांचा विरोध पाहून रूग्णवाहिका कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, पोलिसांची गाडी आल्यानंतर जमाव अधिकच आक्रमक झाला.
या जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस आणि एक परिचारिका जखमी झाली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

No comments:
Post a Comment