Sunday, 2 August 2020

कुंडलिका पाटनुस विद्यालयाचा एसएससी २०२० चा १०० टक्के निकाल सागर भालेराव यांनी केले अभिनंदन !

कुंडलिका पाटनुस विद्यालयाचा एसएससी २०२० चा १०० टक्के निकाल  सागर भालेराव यांनी केले अभिनंदन  ! 
 
   
      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )  रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील कुंडलिका शिक्षण प्रसारक मंडळ यांचे,  कुंडलिका विद्यालय पाटनुस या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून सदर विद्यालयात ९० टक्के विद्यार्थी हे मागासवर्गीय आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देत या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि संस्था चालक अत्यंत मेहनत घेत होते आणि अखेर बऱ्याच वर्षानी विद्यालयाचा निकाल हा १०० टक्के लागला असून विद्यालयातील सर्वांचा आनंद गगनाला भिडला आहे. तसे पाहता हे विद्यालय खूप जुने आहे परंतु स्पर्धेच्या जगात अजून ही टिकाव धरून आहे या विद्यालयातील सर्व शिक्षक हे उच्चशिक्षित आहेत आणि संस्था चालक हे देखीळ कार्यतत्पर आहे आणि सर्वांच्या एकत्रित कामाला आज यश मिळाले आहे असेच विद्यालयाची दिवसेंदिवस प्रगती होवोत अशा शुभेच्छा वंचित बहुजन आघाडीच्या रायगड जिल्हा अध्यक्ष विश्वतेज साळवी आणि मा. सागर भालेराव महासचिव रायगड जिल्हा यांनी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...