Thursday, 13 August 2020

कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट समालोचक व क्रीडापट्टू असलेल्या सुधाकर उभारे यांच्या निधनाने माणगांव मध्ये शोककळा !

कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट समालोचक व क्रीडापट्टू असलेल्या सुधाकर उभारे यांच्या निधनाने माणगांव मध्ये शोककळा !


    बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील माणगांव पंचायत समितीचे माजी सभापती श्री. प्रभाकरदादा उभारे,  कमलाकरदादा उभारे, पत्रकार श्री पद्माकर उभारे, माणगांव नगरपंचायतीचे आरोग्य सभापती श्री रत्नाकर उभारे  यांचे बंधू श्री सुधाकर उभारे यांचे दीर्घ आजाराने मुंबई जुहू येथील पारेख हॉस्पिटलमध्ये बुधवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वांना अतीव दुःख झाले. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण उभारे कुटुंबियांवर आणि समस्त माणगांव तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, चार भाऊ, दोन बहिणी, एक मुलगी आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे. 
      सुधाकर उभारे हे माणगांव तालुक्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. ते अव्वल दर्जाचे क्रिकेट खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक, धावपट्टू, त्याच बरोबर ते कब्बडी, खोखो खेळात माहिर होते. तसेच ते फुटबॉल प्लेअर, हॉलीबॉल प्लेअर, कॅरम प्लेअर होते या शिवाय ते सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट समालोचक होते. त्यांनी माणगांव मध्ये साईनाथ क्रिकेट क्लबची स्थापना केली होती. 
    माणगांव तालुक्यातील साईनाथ क्रिकेट क्लबचा क्रिकेट आणि क्रीडा क्षेत्रात संपूर्ण माणगांव तालुका आणि रायगड जिल्ह्यात सर्व क्रिकेट संघाला दरारा, व धस्का होता. 
     सुधाकर दादा उभारे यांचे माणगांव शहरातील रेडिओ, टेपरेकॉर्डर, टिव्ही दुरुस्ती आणि ऑडिओ, व्हिडिओ कॅसेट चे दुकान म्हणजे सर्व माणगांव तालुक्यातील लोकांसाठी आपल्या आवडीच्या व आपणास हव्या असलेल्या चित्रपट गीतांची, शक्ती तुरा नावाच्या कॅसेट हमखास व खात्रीशीर वाजवी दरात मिळण्याचे हक्काचे ठिकाण होते. सुधाकर दादांच्या हसतमुख मितभाषी प्रेमळ स्वभावामुळे त्यांच्या माणगांव निजामपूर रोड कॉर्नर वरील दुकाना समोर नेहमी माणगांव तालुक्यातील सर्व समाज घटकातील लोकांचे लोकांना नेहमी आवर्जून दर्शन व्हायचे. सुधाकर दादा उभारे श्री साईबाबांचे निस्सीम भक्त होते. श्री साईबाबांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. 
     सुधाकर दादा उभारे यांचे मोठे बंधू माणगांव पंचायत समितीचे माजी सभापती माननीय प्रभाकरदादा उभारे यांनी आपल्या माणगांव शहरातील मुंबई गोवा महामार्गा लगत असलेल्या अंकूर कॉम्प्लेक्स इमारतीसमोर आयोजित केलेल्या सर्व प्रकारच्या उदाहरणार्थ दहीहंडी, नवरात्रौत्सव इत्यादी   सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुधाकर दादा उभारे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने करत असत. अशा सुधाकर दादा उभारे यांच्या अकाली निधनाने संपूर्ण माणगांव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर माणगांव नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या स्मशानभूमीत शासनाच्या लॉकडाऊन पार्श्वभूमीवरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून त्यांचे कुटुंबीय, मित्र परिवार, आप्तेष्ट आणि माणगांव करांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांची लोकसभा व कार्य शुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या माणगांव येथील राहत्या घरी होणार आहेत.

No comments:

Post a Comment

कुर्मी जोडो अभियानाची घोषणा ; समाज एकतेसाठी राज्यभर उपक्रम !!

कुर्मी जोडो अभियानाची घोषणा ; समाज एकतेसाठी राज्यभर उपक्रम !! मुंबई : अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा, महाराष्ट्र प्रदेश यांच...