Monday, 21 September 2020

कोरोना बाधित पत्रकांरासाठी राखीव बेड व मोफत उपचार मिळावेत- माजी आमदार पांडुरंग बरोरा,

कोरोना बाधित पत्रकांरासाठी  राखीव बेड व मोफत उपचार मिळावेत-  माजी आमदार पांडुरंग बरोरा,            
        
*एकाकी योद्धा दुर्लक्षितच**

मुरबाड (मंगल डोंगरे) :
गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसें दिवस महामारीच रुद्र रुप धारण करीत असताना. या लढाईत सुरुवाती पासून पत्रकार नावाचा योद्धा फ्रंट लाईनवर कार्यरत राहिला आहे. पत्रकारिता हि तारेवरची कसरत करीत स्वताचा कुटुंबाचा तोल सावरत नाव सोनुबाई हाती,, या उक्ती प्रमाणे  अवस्था असलेला. हा योद्धा दिवसे गणीक कोरोनाबाधित संख्या वाढत आहे.
                 पत्रकार या नात्याने काम करताना त्यांना संसर्गाची लागण होते, यास्तव महाराष्ट्र शासनाने शासकिय धर्मदाय आयुक्ताच्या अखत्यारीत येणाऱ्या तालुका पातळीवर बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी.तसेच त्यांना मोफत उपचार करावेत अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली आहे.
               माजी आमदार पांडुरंग बरोरा हे गेल्या पाच महिन्यापासून कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा म्हणून कार्यरत आहेत. त्यातच कोरोना रुग्णांना कोविड सेंटर मध्ये दाखल करतांना त्यांचा संसर्ग झाल्याने ते देखील कोरोना बाधित झाले होते. परंतु ते उपचार करून बरे झाले आहेत.कोरोनाचा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव भोगलेल्या व्याथा खर्चाचा तपशील पाहता ही महामारी पत्रकारांच्या अवाक्या बाहेरची असल्याची जाणीव झाल्याने, त्यांनी एका निवेदनाद्वारे मागणी करून या वर्गाला खाजगी किंवा शासकिय रुग्णालयात राखीव बेडची व्यावस्था व मोफत उपचार करावेत .गेल्या सहा महिन्यांत कोविडने राज्यात सुमारे २५० पेक्षा अधिक पत्रकारांना हि बाधा झाली होती, त्यात आजपयॆत ३०च्या आसपास जनाना आपला प्राण गमवावा लागला आहे,
                 त्यात पंढरपूरचे रायकर असतील.तर डोंबिवलीचे सामनाचे विकास काटदरे असतील. मृत झालेल्या पत्रकारांना स्मशान भूमीदेखील वेळेवर मिळत नाही ?  बाधित होण्याची वाढती संख्या आणि उपचारासाठीची होणारी हेळसांड लक्षात घेऊ प्रत्येक रुग्णालयात पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावयास हवीच अशी मागणी या पूर्वी देखील पत्रकार संघटनांनी केली आहे. राज्यभरात कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या कुटूंबियांना राज्यशासनाकडून ५० लाखाची मदत देण्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती.
मात्र विकास काटदरे यांच्या परिवाराला अद्याप पर्यंत कोणतीच मदत मिळालेली नाही.
इतर व्यवसाया प्रमाणे वृत्तपत्र व्यवसायाला अद्याप पर्यंत शासना कडून कोणतीही मदत मिळालेली नाही. वृत्तपत्र व्यवसायाला देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउनचा फटका बसलेला आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेकांना गेल्या सहा महिन्यापासून मानधन देखील मिळाले नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्न अनेक पत्रकारांसमोर आहे.
अशा स्थीतीत काम करताना कोरोनाची बाधा झाली तर उपचारासाठी खर्च कसा करायचा ? हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न त्यांच्या समोर आहे. त्यामुळे बाधित पत्रकारांवर तालुका स्थरावरील रुग्णांलयात राखीव बेड व मोफत उपचार करण्यात यावेत अशी मागणी शिवसेना माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.

*************************
कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळावा म्हणून मी देखील कोविड सेंटरात फेऱ्या मारतांना रुग्णाच्या 
संसर्गात बाधित झालो होतो. मात्र 
उपचार आणि कोरोटाईन राहून पूर्ण बरा झालो आहे.
मा.आ.पांडुरंग बरोरा
९४२२३८५४४४

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...