Monday, 21 September 2020

ग्रामीण रुग्णालय मुरबाड साठी नवीन रुग्ण वाहिका उपलब्ध !!

ग्रामीण रुग्णालय मुरबाड साठी नवीन रुग्ण वाहिका उपलब्ध !!                     
  
**आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते  लोकार्पण  **               
मुरबाड -- {मंगल डोंगरे} : मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतुन मुरबाड तालुक्यातील ग्रामिण रुग्णालयासाठी नविन रुग्णवाहिका दिली असून तिचे लोकार्पण आज आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड येथिल छञपती शिवाजी महाराज चौक येथे केले.    

                 
यावेळी आमदार म्हणाले  मुरबाड मधील कोणावरही या रुग्णवाहिकेत बसण्याची वेळ येऊ नये परंतु पर्याय नसल्याने अतितातडीच्या रुग्णांसाठी तसेच गरोदर महिलांसाठी एक  चांगला दिलासा मिळणार आहे. या रुग्णवाहिकेची चावी आमदारांनी रुग्ण वाहिका चालक तानाजी   भोईर याच्याकडे सूपुर्द केली.    ग्रामिण रुग्णालयात गेली ११ वर्ष तानाजी भोईर हा चालक  रुग्ण वाहिकेवर काम करत असून त्यांनी  आजपर्यंत मुरबाड मधिल हजारो रुग्णांना राञी - अपराञी निस्वार्थी सेवा देण्याचे काम केले आहे.                    
या उद्घाटनासाठी साठी मुरबाड पोलीस स्टेशनचे  पोलीस निरिक्षक दत्ताञय बोराटे , सभापती श्रीकांतजी धुमाळ , रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी हेमंतकुमार खंबायत , भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सुर्यराव ,जिल्हा सरचिटणीस नितीन मोहपे , जिल्हा परिषद सदस्य उल्हासभाऊ बांगर , नगराध्यक्षा छायाताई चौधरी , उपनगराध्यक्षा अर्चना विशे , जिल्हा  महिला अध्यक्षा शितल तोंडलीकर , ज्योतीताई गोडांबे, तालुका सरचिटणीस सुरेश बांगर  व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...