Monday, 21 September 2020

पत्रकारांना विमा संरक्षण आणि अर्थिक मदत या साठी माणगांव प्रेस क्लबचे तहसिलदारांच्या माध्यमातून शासनाला लेखी निवेदन...!

पत्रकारांना विमा संरक्षण आणि अर्थिक मदत या साठी माणगांव प्रेस क्लबचे तहसिलदारांच्या माध्यमातून शासनाला लेखी निवेदन...! 


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार पत्रकारांना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे मानाचे आणि सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यामुळे  राज्यातील सर्व पत्रकारांना शासनाकडून विमा संरक्षण आणि कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असे म्हटले जाते. आणि ते त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण या चौथ्या स्तंभामुळे भारतीय लोकशाहीचा प्रचंड डोलारा सर्वार्थाने स्थीर आहे. 
      त्यामुळे लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला सर्व शासन सुविधा पुरविणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून राज्यातील सर्व पत्रकारांना विमा संरक्षण आणि कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे  मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला पन्नास लाखांची आर्थिक मदत मिळावी या करीता राज्यातील पत्रकारांचे आधारस्तंभ माननीय श्री. एस एम देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व पत्रकारांनी आपापल्या जिल्हा, तालुका निहाय शासनाला लेखी निवेदने दिली आहेत. याच पार्श्वभूमीवर रायगड प्रेस क्लब संलग्न माणगांव प्रेस च्या माध्यमातून सोमवार दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी माणगांव प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री. उत्तम तांबे, कार्याध्यक्ष श्री. पद्माकर उभारे, माजी अध्यक्ष श्री.गौतम जाधव, खजिनदार श्री. संतोष सुतार, सदस्य श्री. हरेश मोरे, श्री. वैभव टेंबे आणि सचिन वनारसे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात माणगांव प्रेस क्लबच्या वतीने माणगांवचे नायब तहसीलदार श्री. भाबड यांच्या माध्यमातून शासनाला लेखी निवेदन सादर केले. 
      सदर निवेदनात पत्रकारांना विमा संरक्षण आणि कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना सुरू करावी, कोरोनानं आजारी पत्रकारांना दवाखान्यात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची तात्काळ व्यवस्था व्हावी आणि रायगड जिल्ह्यातील कर्जत माथेरान चे पत्रकार संतोष पवार आणि पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूस जबाबदारांवर कारवाई झाली पाहिजे. अशा अनेक मागण्या केल्या आहेत. 
        कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य महामारीच्या महाभयंकर काळात पत्रकार आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची पर्वा न करता आपले कर्तव्य इमानेइतबारे पार पाडत आहेत. त्यामुळे पत्रकारांना कोरोना यौध्दे असे संबोधले जाते तर त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी शासनाने घेतली पाहिजे. दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाख आणि पत्रकार विमा योजना तात्काळ सुरू करा अशा अनेक मागण्या पत्रकारांनी केल्या आहेत. 
       पत्रकारांच्या वरील सर्व मागण्यांसंदर्भात राज्यातील पत्रकारांच्या भावना किती वाजवी आणि रास्त आहेत याची जाणीव सरकारला झाली असेलच यात शंका नाही. त्यामुळे पत्रकारांच्या मागण्यांचा शासन गांभिर्याने विचार करून त्या लवकरात लवकर मान्य करेल अशी राज्यातील सर्व पत्रकारांची अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...