मुरबाड मध्ये विविध उपक्रमांनी आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस साजरा !!
मुरबाड (मंगल डोंगरे) : 17 सप्टेंबर हा दिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस व 19 सप्टेंबर हा दिवस मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस हा दुग्ध शर्करा योग मुरबाड विधानसभा मतदार.संघातील नागरिकांना एक पर्वणीच लाभली असुन त्यानिमित्ताने मुरबाड तालुक्यात विविध उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.
यावर्षी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मला भेटण्याचा प्रयत्न करू नये.जाहिरात बाजी करू नये.असे आवाहन केले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी मुरबाड तालुक्यात भाजपा युवा मोर्चा च्या वतीने ठिकठिकाणी व्रुक्ष रोपन करण्यात आले. मुरबाड पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ यांच्या वतीने मुरबाड शहरासह संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले असुन,एक लाख मास्क वाटपचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना सांगितले. तर मुरबाड नगर पंचायतच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका भाजपा महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्षा शितल ताई तोंडलीकर यांनी सुमारे 200 लोकांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करून आमदार किसन कथोरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर विद्यमान नगराध्यक्षा छायाताई चौधरी यांच्या कडून संपूर्ण मुरबाड शहरात बाकडे वाटप जेष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून बसण्याची व्यवस्था करून जेष्ठां कडून ही कार्यसम्राट आमदार कथोरे साहेबांना समाज सेवेसाठी निरोगी दिर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली.तर भाजपा मुरबाड तालुका कार्यकारिणी तर्फे ग्रामीण रुग्णालय मुरबाड यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आली.तसेच नगरसेविका साक्षीताई चौधरी यांनी कोव्हीड रुग्णालयात रुग्णांच्या करमणुकी साठी एल.ईडी.टि.व्ही. वायफाय भेट देवून रुग्णालयातील डॉक्टर, रुग्ण, नर्स,वाहन चालक,यांचा भेटवस्तु,शाल गुच्छ देवून सन्मान करण्यात आला. तर समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष पत्रकार शंकर करडे यांनी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक तसेच पत्रकारांच्या उपस्थितीत केक कापून अभिष्टचिंतन केले.मात्र यावेळी सामाजिक अंतर राखून संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली.


No comments:
Post a Comment