लक्ष्मण घागस यांना राज्य स्तरीय पुरस्कार !!
मुरबाड {मंगल डोंगरे} : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तोंडली येथील मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण घागस यांना राज्यस्तरीय ' कर्तृत्ववान मुख्याध्यापक ' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
5 सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या निमित्ताने नाशिक येथून प्रसिद्ध होणारे ' शिक्षक ध्येय ' या मासिकाने राज्यातील उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक व अन्य शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी नवोपक्रम स्पर्धा आयोजित केली होती.त्यात नाविन्यपूर्ण उपक्रमांतून शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे सहाशेहून अधिक कर्तृत्ववान शिक्षकांनी स्पर्धेसाठी भाग घेतला होता. प्रत्येकाने प्रत्यक्ष केलेल्या उपक्रमावर आधारित प्रकल्प /प्रस्ताव सादर केले होते. संपादक श्री. मधुकर घायदार यांच्या कल्पनेतून ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अंगणवाडी सेविका पासून उच्च अधिकारी वर्गापर्यंत सात गटात ही स्पर्धा घेण्यात आली मुख्याध्यापक गटातून सुमारे 200 प्रस्ताव प्रकल्प सहभागी झाले होते. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामधील तोंडली या जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले श्री. लक्ष्मण घागस यांनी शास्त्रीनगर शाळेवर राबविलेल्या pre- primary semi English school Shastrinagar (पूर्व प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा शास्त्रीनगर) या उपक्रमाला राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. 33 वर्ष प्रदीर्घआणि निष्ठावंतपणे सेवेचे हे प्रतीक म्हणून श्री. लक्ष्मण घागस यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी पाच वर्षांमध्ये शाळेचा पट दोनशे पन्नास टक्के पर्यंत वाढवून उत्तम दर्जा देणारी शास्त्रीनगर ही जिल्ह्यातील अव्वल शाळा निर्माण केली आहे. त्यापूर्वी त्यांना जिल्हा परिषद ठाणे यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार, लोक हिंद गौरव पुरस्कार इत्यादी अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कारांनी गौरविण्यात आलेआहे.
जी शाळा शासन दरबारी कोणाच्याही खिजगणतीत नव्हती .अशा शाळेला जिल्ह्यात अव्वल स्थानावर नेण्याचे अत्यंत प्रभावी व प्रेरणादायक काम यांनी अनेक उपक्रमातून केलेले आहे . त्यांची One digit tally method, दैनंदिनी लेखन, स्कूल प्रोजेक्ट बँक, वन मिनिट रीडिंग, फाईव्ह मिनिट रायटिंग, माझे वाचनालय, उच्चार सुधार प्रकल्प हे आणि याप्रमाणे अनेक शैक्षणिक प्रयोग प्रसिद्ध आहेत.
लक्ष्मण घागस उत्कृष्ट लेखक आणि कवी आहेत. त्यांचा जानोसा कथासंग्रह आणि चैत्रशलाका काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या स्फुटलेखन प्रेरणादायी असते. सध्या ते कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरबाडचे अध्यक्ष असून शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रात त्यांचे स्थान अत्यंत वरचे आहे या कारणाने या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Congratulations sir
ReplyDeleteसर, आपण आपल्या vlog वर बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल आपला आभारी आहे..... सांप्रत काळात निःस्वार्थ सेवा करण्याची प्रथा नाही.... आपण समग्र वृत्त प्रसिद्ध करून मला उपकृत केले. धन्यवाद !!🙏🙏🙏
ReplyDeleteप्रथा मोडणारेच समाजाप्रती क्रांतीकारक असतात .....🙏
ReplyDelete