नागरिक विकास पार्टीच्या विविध पदांसाठी नियुक्ती !
कल्याण, प्रतिनिधी : नागरिक विकास पार्टी सामाजिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे काम करीत आहे. नागरिकांच्या समस्या, रोजगार, किंवा इतर सामाजिक अडचणी सर्व क्षेत्रात त्यांनी भरपूर काम केले असून आता कोरोनाचे संकट व लॉकडाऊन यात अत्यंत भरीव असे कार्य केले. सर्व समाजातील घटक कोणताही धार्मिक भेदभाव न करता आपलासा केला आहे.
अशा सामाजिक जाणीव असलेल्या नागरिक विकास पार्टीत सहभागी होण्यासाठी लोकांचा ओघ वाढला आहे यामुळे सर्वांना सामावून घेताना त्यांचा विविध पदे देऊन गौरव केला व त्यांच्या वर त्यांच्या प्रभागात सामाजिक कार्य करण्याची जबाबदारी दिली.
नागरिक विकास पार्टीच्या मध्यप्रदेश येथील जबलपूर जिल्हा अध्यक्ष पदी मा. विवेक सिंह, महाराष्ट्र, कल्याण जिल्हा उपाध्यक्ष पदी मा. हरिश्चंद्र लोंढे, कल्याण पश्चिम मंडल शहर उपाध्यक्ष दिपक सुर्यकांत घमरे, कल्याण पुर्व मंडल महिला मोर्चा उपाध्यक्ष साक्षी चंद्रकांत गजभिये, उल्हासनगर शहर उपाध्यक्ष प्रविण रावसाहेब दळवी, कल्याण पुर्व मंडल शहर सचिव सतिश पाठारे.
वार्ड क्रमांक ४०(शिवाजीनगर, वालधुनी, कल्याण) च्या उपाध्यक्ष पदी सौ अक्षता अनिल परासर, महासचिव पदी सौ असमा सरफराज शेख, धर्मिष्ठा किशोर गौरी, सचिव पदी सौ कला पांचाळ, सौ वैशाली लहू गायकवाड यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
हा पद वाटप व सदस्य, कार्यकर्ते स्वागताचा कार्येक्रम महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य मा. डॉ प्रमोद सुदाम हेंलदूलकर, पार्टीचे राष्ट्रीय महासचिव मा. डॉ ब्रिजेश पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष मा. संतोष सिंह यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पार्टीच्या सन्मानित सदस्य वार्ड क्रमांक ४०, कल्याण अध्यक्षा सौ कांचन हरिश्चंद्र लोंढे, बुथ अध्यक्ष सौ सिंधू रमेश सोनवणे, वार्ड क्रमांक ९५ अध्यक्षा सौ नागिना उमर शेख तसेच पार्टीचे अनेक सन्मानित कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
आलेल्या सर्व सन्मानिय सदस्यांचे स्वागत करून पार्टीची रुपरेषा समाजावून राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सिंह व राष्ट्रीय महासचिव मा. डॉ ब्रिजेश पांडे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment