कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंडी देणा-या कोंबड्यांना सोनियाचे दिवस, गावठी कोंबडीचे एक अंडे वीस रुपयावर?
कल्याण (संजय कांबळे) : कोरोना पाॅझिटिव आलेल्या रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी त्यांना औषधा बरोबरच रोज अंडी खायला देतात. त्यात असणाऱ्या विविध घटकांमुळे पेंशंट ची प्रतिकार शक्ती वाढते अशी माहिती सोशलमिडयावर व्हायरल होत असल्याने सध्या या अंड्यांना सोन्याचे दिवस आले असून ही सोन्याची अंडी देणा-या कोंबड्यांची ग्रामीण भागात विशेष काळजी घेतली जात आहे.
सध्या जिकडे तिकडे कोरोनोच्या वाढत्या रुग्ण संख्येची चर्चा ऐकायला मिळत आहे. दिवसागणिक बदलणारे आकडे आणि मृत्यू पावणारे जवळचे मित्र, नातेवाईक यामुळे यावर विश्वास बसतो व मग भितोचे वातावरण निर्माण होते कोणीतरी कोरोना पाॅझिटिव आल्याने हाॅस्पिटल मध्ये अॅडमिट केलेला पेंशंट बरा होऊन घरी येतो. मग आपण त्याला काय उपचार मिळायचा या विषयी माहिती घेतो आणि त्यानुसार आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. कोरोना कोव्हीड व्हायरस विरोधात लढण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होणे गरजेचे असते. मग त्यासाठी "सी" जीवनसत्त्व असणारे संत्री, मोसंबी, आंबा, अननस, केळी प्रोटिन्स साठी अंडी, कडधान्ये खाणे सुरु करतो केवळ कल्याण तालुक्यातचा विचार केला तर ग्रामीण भागात १४११ अॅक्टिव रुग्ण आहेत. तर मृत्यूचा आकडा ९०वर पोहचला आहे तसेच कल्याण ग्रामीण भागात ७९० पाॅझिटिव पेंशंट असून दिवसेंदिवस ते वाढत आहेत. असे असतानाही दुर्दैवाने तालुक्यात एकही सरकारी कोरोना रुग्णालय नाही. जे वरप येथे कोरोना कोव्हीड हाॅस्पिटल सुरू होणार होते ते सर्व सोईसुविधा युक्त सुरू व्हायला आॅक्टोबर उजाडेल असे वाटते. त्यामुळे सध्या तरी काळजी घेणे हा एकमेव पर्याय नागरिकांसमोर आहे. त्यामुळे मग घरगुती उपाय केले जातात यामध्ये गावठी कोंबड्यांची अंडी उकडून खाणे, विविध आर्युवेदिक काढा पिणे, ब्लाक टी घेणे आदी उपायाचा समावेश केला जातो. याचा परिणाम म्हणून गावठी अंड्यांना मागणी वाढली आहे. एका अंड्याची किंमत ३ते४ रुपयांवरून चक्क १८ते २० रुपयावर गेली आहे तर इंग्लिश कोंबडीची अंडी ६/८ रुपयावर पोहोचले आहे.
अंड्यामध्ये हाय प्रोटिन्स तसेच ऐ, बी जिवनसत्व मोठ्या प्रमाणात असतात ते कोरोना पाॅझिटिव रुण्गांच्या शरीरात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात. त्यामुळे अंड्याना मागणी वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात या "सोन्याची अंडी" देणा-या कोंबड्यांची बाऊल, मुंगूस, कुत्री यांच्या पासून विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळे कोंबडी आधी की अंडे? अंडे शाकाहारी की मांसाहारी असे निरर्थक वाद निर्माण न करता, अंड्याचा फंडा ओळखून कोरोनोच्या मानगुटीवर बसून त्याला संडे असो की मंडे रोज खाऊन अंडे गाडून टाकायला हवे!


No comments:
Post a Comment