रायगड जिल्ह्यातील माणगांव व पनवेल तालुक्यात राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रव्यापी आंदोलन यशस्वीपणे संपन्न !!
बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने ५ जून २०२० रोजी सरकारने शेतकरी विरोधी तीन अध्यादेश काढले ज्यात शेतकरी वर्गाचे खूप मोठे नुकसान होणार असून शेतकरी उत्पादन ,खरेदी विक्री व्यवस्था, साठवण व्यवस्था ,करार शेती ,अश्या अनेक अधिकारापासून शेतकरी वर्ग वंचित होणार आहे त्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा या राष्ट्रीय संघटनेने देशव्यापी आंदोलन सुरू केले त्यातील आज दुसऱ्या चरणात रायगड जिल्यात दक्षिण रायगड मधील माणगाव व उत्तर रायगड मधील पनवेल येथे हे आंदोलन शेतकरी विरोधी अध्याआदेशा बद्दल जागृतीपर माहिती देऊन व ५४३ लोकसभा सांसद यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून यशस्वीपणे पार पडले.
या आंदोलनात शेतकरी संघटना, शेतकरी ,शेतकरी बचत गट यांनी सहभाग नोंदवला तसेच भारत मुक्ती मोर्चा ,भारतीय विदयार्थी मोर्चा ,बहुजन मुक्ती पार्टी , बहुजन क्रांती मोर्चा आदींनी पाठिंबा दर्शवला व आंदोलन यशस्वी केले. यावेळी संयोजक विजय आवास्कर, राकेश मोरे,मिलिंद साळवी यांनी सर्व सहभागी यांचे आभार मानून शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करावेत असा सरकारला इशारा दिला.अन्यथा पुढील चरणात तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment