मुरबाड तालुका गट शिक्षणाधिकारी पद रिक्त !! *पंचायत समितीे सभापती व उपसभापती यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालुन केला निषेध व्यक्त*
मुरबाड.(मंगल डोंगरे) : कोविड 19 मुळे सर्व शाळा बंद असल्या तरी आँनलाइन शिक्षण देणे शासनाने सुरु केले असुन त्याशिक्षकावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शिक्षकदिन तोंडावर आलेला असूनही मुरबाड तालुक्यात गट शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ व उपसभापती अरूणा खाकर यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून आपला निषेध व्यक्त केला .. ..
सन 2010 पासून मुरबाड तालुका गट शिक्षणाधिकारी पद भरलेले नाही याबाबत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांना कळवूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते सध्याच्या प्रभारी गट शिक्षणाधिकारी 14 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यंत रजेवर आहेत त्यांचे जागी ज्यांना नेमायचे आहे त्या विस्तार अधिकारी कोरोना मुळे विलगी करणात आहेत , शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे सुद्धा भरलेली नाहीत .त्यामुळे हे आंदोलन केल्याचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी आमचे मुरबाड तालुका प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना सांगितले .


No comments:
Post a Comment