"अखिल मुरबाड तालुका आगरी समाज
आयोजित"
विद्यार्थी गुणगौरव समारंभ २०२० संपन्न !
मुरबाड (मंगल डोंगरे) : सोमवार, दिनांक ३१-०८-२०२० रोजी मुरबाड तालुक्यातील आगरी समाजातील मार्च २०२० मध्ये विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ हनुमान मंदिर सभागृह डोंगरन्हावे, या ठिकाणी पार पडला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे दरवर्षी प्रमाणे एकत्रित येवून मोठ्या थाटमाटात होणारा गुणगौरव समारंभ कायद्याने व सामाजिक द्रुष्ट्या शक्य नसल्याने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करताना अनेक गोष्टींमुळे हा कौतुक सोहळा घेण्यात दिरंगाई होत होती. अशा वेळी अखिल मुरबाड तालुका आगरी समाज गुणगौरव समितीच्या वतीने एक अत्यंत चांगला निर्णय घेवुन सदर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा समाजातील प्रत्येक गावागावात जावून करण्याचे ठरले आहे. त्यानुसार आज हा कार्यक्रम डोंगरन्हावे येथे डोंगरन्हावे, जांबुर्डे व आगाशी या गावातील १०९ विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तिन्ही गावातील सन्माननीय सरपंच, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर पाटगाव येथे जाऊन तेथील १० गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
याप्रमाणेच समाजातील गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी विद्यार्थी गुणगौरव समिती २०२० तयार केली असून समितीमार्फत समाजातील दानशुर व्यक्तींना सहाय्यासाठी आवाहन केले आहे. सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने श्री. रामभाऊ दुधाळे, शिवसेना मुरबाड शहर प्रमुख,श्री. प्रमोदजी ऐनकर, श्री. भगीरथजी भांडे, श्री. सचिनजी माळी, श्री. रवींद्रजी भांडे, श्री. तुलशीरामभाऊ देशमुख, श्री. विलासजी शेलके, यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम नियोजन करुन हा कार्यक्रम पर पडला. व पुढील उर्वरित कार्यक्रम हा विद्यार्थी गुणगौरव समितीने ठरविल्या प्रमाणे टप्प्यात घेणार असल्याचे संयोजक-आयोजक दिलीप खाटेघरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment