Tuesday, 22 September 2020

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेने मुरबाडमध्ये राबविला कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम! विद्यार्थीसेना शहरअध्यक्ष देवेंद्र जाधव यांची कौतुकास्पद कामगिरी !!

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेने मुरबाडमध्ये  राबविला कोरोना योद्धा सन्मान कार्यक्रम! विद्यार्थीसेना शहरअध्यक्ष देवेंद्र जाधव यांची कौतुकास्पद कामगिरी !!


मुरबाड {मंगल डोंगरे} : गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊन व अनलॉकडाऊनच्या कालावधीत मुरबाड शहरातील व तालुक्यातील अनेक वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर,परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आदी लोक आपल्या जीवाची पर्वा न करता व जोखीम पत्करून तालुक्यातील लोकांची सेवा करत आहेत . अशा खऱ्याखुऱ्या कोरोना बहाद्दरांचा  त्यांच्या घरी जाऊन व त्यांचा सन्मान करण्याची कौतुकास्पद कामगिरी नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेना मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यानी केली आहे . 'कोरोना योद्धा सन्मानपत्र' व नावाची आकर्षक व सुंदर फ्रेम देऊन देवेंद्र जाधव यांनी मुरबाड शहरातील व तालुक्यातील  सन्मानजनक व्यक्तींचा सन्मान करण्याची कामगिरी करुन अनेक कोरोना योद्धा यांचा  याप्रसंगी सन्मान  केला आहे. ज्यामध्ये मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार बंडू उर्फ अण्णा जाधव, मुरबाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे, मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा छाया चौधरी , मुरबाड नगरपंचायतीचे मुख्या धिकारी परितोष कंकाळ, मुरबाडच्या शासकीय कोविड हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंतकुमार  खंबायत, मुरबाडचे गुप्तहेर पोलीस मेजर विनायक खेडेकर, केटीव्ही न्युज चॅनेलचे प्रतिनिधी भरत दळवी,दैनिक पुढारीचे प्रतिनिधी बाळासाहेब भालेराव, दैनिक सागरचे प्रतिनिधी आनंत घागस, दैनिक ठाणे वैभवचे प्रतिनिधी मंगल डोंगरे,दैनिक जीवनदीप वार्ताचे प्रतिनिधी दिलीप पवार, महाराष्ट्र लाईव्ह मुरबाड न्युज चॅनेलचे प्रतिनिधी  लक्ष्मण पवार,एन. टिव्ही  न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी अरुण ठाकरे, स्वप्नज्योती टाइम्स चॅनेलचे संस्थापक नामदेव शेलार, महाराष्ट्र माझाचे सचिन पोतदार , मुरबाड बदलापूर अपडेटचे प्रतिनिधी चेतन पोतदार , जनशक्ती न्यूजचे प्रतिनिधी  जीवन शिंदे,  शब्द मशालचे प्रतिनिधी किशोर गायकवाड  आदींचा याप्रसंगी देवेंद्र जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यानी घरोघरी जाऊन यथोचित सन्मान केला आहे. " संपूर्ण मुरबाड तालुका एकजूट होऊन कोरोना महामारीशी लढत आहे. अशा कठीण परिस्थितीत  अनेक कोरोना योद्धा मुरबाडच्या जनतेसाठी करीत असलेले सेवाकार्य अतुलनीय आहे. आपल्या सेवेने आज सर्वांसमोर मानवतेचे एक नवीन उदाहरण ठेवले आहे. आपल्या धैर्याला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना मुरबाड शहर तर्फे आम्ही सलाम करत आहोत." अशी प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र जाधव यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना  दिली .  यावेळी देवेंद्र जाधव यांच्यासोबत आजीम मणियार, सचिन जाधव,उमेश सोनावणे,आकाश लिहे, ऋषिकेश तेलवणे,सिद्धेश रोठे,श्रेयस तेलवणे ,सुशील बैरागी,अजय यशवंतराव ,विकास गुप्ता, भूषण माळी, प्रथमेश भोईर आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध कार्यक्रम चे आयोजन !!

भांबेड गावातील श्री वाघजाई तरुण विकास मंडळ-नार्डेकरवाडी तर्फे श्री वाघजाई मंदिरच्या द्वितीय वर्धापनदिननिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विवि...