Tuesday 22 September 2020

संपूर्ण महाराष्ट्रात कोविड हॉस्पिटलमध्ये महिलांना सुरक्षा द्या !! ** मुरबाड,बदलापुर मध्ये निवेदन देवून भाजपा महिला मोर्चा ची मागणी **

संपूर्ण महाराष्ट्रात कोविड हॉस्पिटलमध्ये महिलांना सुरक्षा द्या !!
      ** मुरबाड,बदलापुर मध्ये निवेदन देवून भाजपा महिला मोर्चा ची मागणी **


मुरबाड ( मंगल डोंगरे ) गेल्या मार्च महिण्या पासुन महाराष्ट्रासह देशभरात पसरलेल्या कोरोना साथ रोगाने
सर्वत्र  महामारीची परिस्थिती गंभीर होत असताना, महाराष्ट्रात कोविड हॉस्पिटलमध्ये महिलांवर अत्याचार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या  घटनांची इतर ठिकाणी  पुनरावृत्ती होऊ नये या साठी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल  पाटील तसेच मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शना खाली भाजपा महिला मोर्चा ठाणे कमिटीच्या वतीने आज बदलापुर नगर परिषद व पोलीस स्टेशन तसेच  मुरबाड पोलीस स्टेशन आणि तहसीलदार मुरबाड यांना निवेदन देवून  महिला रुग्णांच्या संरक्षणाची मागणी करण्यात  आली आहे. 


दिवसेंदिवस  कोविड हॉस्पिटलमध्ये महिलांवर अत्याचार होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.अशा घटनांची इतर ठिकाणी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी  म्हणून,ज्या ज्या ठिकाणी कोव्हीड हाँस्पिटल आहेत. त्या, त्या ठिकाणी महिला रुग्णांसाठी स्वतंत्र वाँर्ड निर्माण करून महिला डॉक्टर,नर्स,स्वच्छता कर्मचारी, यांची नेमणूक करण्यात यावी.तसेच तात्काळ सी.सी.टी.व्ही. कँमेरे बसविण्यांत यावेत.आणि प्रत्येक कोव्हिड सेंटरसाठी महिला काँन्स्टेबल ची चोवीस तासासाठी नेमणूक करून गस्तीसाठी महिला पोलीस देण्याची तरतूद व्हावी.या सर्व मागण्यांसाठी  खास  भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश च्या कमिटीच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्र भर प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांच्या आदेशाने ठिक ठिकाणी निवेदने देण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून मुरबाड पोलीस ठाण्यात व मुरबाड तहसीलदारांना निवेदन देऊन लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चा ठाणे महिला अध्यक्षा शितल तोंडलीकर यांनी केली आहे.यावेळी माजी उपसभापती सिमाताई घरत,उपसभापती अरुणा खाकर,नगराध्यक्षा छाया ताई चौधरी,नगरसेविका उर्मिला ठाकरे,पं.स.सदस्या स्वरा चौधरी,स्नेहा धनगर,,महिला सदस्या अर्चना पिसाट,शिल्पा देहरकर,अनिता कथोरे,सुरेखा गायकर ,राणे मँडम, यांसह मोठ्या संख्येने कमिटीच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...